हिंगणघाट शहरात तात्पुरते कोव्हिडं संक्रमण (ट्रान्झिट)सेंटर सुरु करण्याची पालकमंत्री यांना विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी

35

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.2मे):- हिंगणघाट शहरात शहर व ग्रामीण परिसरातील कोव्हिडं रुग्ण मोठया प्रमाणात उपचार घेण्यासाठी येतात परंतु त्यांना उपजिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे असे रुग्ण विविध दवाखान्यात फिरतात व बेडअभावी त्यांची प्रकृती गंभीर होऊन प्रसंगी अश्या रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. त्याकरिता डॉ. बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी संयुक्त सभा घेऊन असे ठरविले की अश्या रुग्णांना तात्पुरती व्यवस्था म्हूणून डॉ.बी. आर. आंबेडकर विद्यालयात निर्माण होणाऱ्या ट्रान्झिट सेन्टर मध्ये भरती करता येते. याकरिता रुग्णांनी आपले नाव अगोदर उपजिल्हा रुग्णालयात नोंदणी करावे.

रुग्णालयात बेड उपलब्ध असेल तर फारच छान जर नसेल तर रुग्णालय प्रशासनाने असे रुग्ण ट्रान्झिट सेंटर मध्ये पाठवावे. तिथे त्यांना प्रथमोपचार सुरू करावा. आणि उपजिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्यानंतर तिथे त्यांना परत भरती करावे. यामुळे फायदा असा होईल की कोव्हिडं पॉझीटीव्ह रुग्णांना बेडकरिता शहरातील दवाखान्यात फिरावे लागणार नाही व वेळेत त्यांना प्रथमोपचार मिळून त्याच्या प्रकृती मध्ये सुधारणा होऊन त्यांचे मनोधेर्य वाढेल. आणि कोरोना आजारापासून त्यांना मुक्ती मिळेल. आजच्या परिस्थितीत कोव्हिडं रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हिंगणघाट शहरातील शासकीय व प्रायव्हेट कोव्हिडं सेंटरमध्ये आज रुग्णांकरिता बेड उपलब्ध नाही. त्यामुळे पेशंट दिवसभर वेगवेगळ्या रुग्णालयात फिरून – फिरून शेवटी हतबल होतो त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. ही अवस्था फार गंभीर आहे. दरम्यानच्या परिस्थितीमध्ये कोव्हिडं रुग्णांची तात्काळ व्यवस्था होणे याकरिता जोपर्यंत नवीन व्यवस्था कार्यान्वित होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था करणे आवश्यक आहे.

शहरातील व ग्रामीण भागातील रुग्ण फार मोठ्या आशेने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात येतात. परंतु अपूर्ण सोयीसुविधांमुळे रुग्णांना येथे भरती न करण्यात आल्याने त्यांची निराशा होते खाजगी दवाखान्याचा खर्च त्यांच्या ऐपतीच्या बाहेरचा असतो अशा अवस्थेत रुग्णांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होतात. हतबल होतात परिणामी रुग्णांना मृत्यूला कवटाळण्या शिवाय मार्ग राहत नाही.अशी वेळ कुणावरही येऊ नये याकरिता अशा गोरगरीब रुग्णांकरिता एक संक्रमण (ट्रान्झिट ) कोव्हिडं उपचार केंद्र तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित होणे गरजेचे आहे . ट्रान्झिट कोव्हिडं -19 सेंटर यामध्ये (1) आलेल्या प्रत्येक रुग्णाची नोंद एका मध्यवर्ती ठिकाणी (उपजिल्हा रुग्णालय) घेण्यात यावी. ज्या दवाखान्यात बेड उपलब्ध आहेत तिथे रुग्णांना भरती करण्यात यावे बेड उपलब्ध नाहीत तेव्हा हे रुग्ण ट्रान्झिट कोव्हिडं सेंटरला पाठविण्यात यावे .(२) इथे येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतील . (3) दरम्यान जिथे बेड उपलब्ध झाले तेथे या रुग्णांना पाठविण्यात येतील. (4) येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला प्राथमिक उपचार करणारे हे केंद्र कार्यान्वित करता येईल असे हे केंद्र असेल . या उपचार केंद्राकरिता डॉ बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक मंडळ अशा कठीण परिस्थितीमध्ये कोव्हिडं रुग्णांना दिलासा देण्याकरिता तयार आहे. डॉ. बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. बी आर आंबेडकर विद्यालय नंदोरी चौक हिंगणघाट येथील इमारत सध्या परिस्थिती शाळा बंद असल्याने तसेच शालेय परीक्षा रद्द झाल्याने रिकामी आहे. आपले स्तरावरून सकाळ-संध्याकाळ एक डॉक्टर व दोन परिचारिका व 2 वार्डबाय याची व्यवस्था जर होऊ शकली तर तीन दिवसात हे सेंटर सुरू होऊ शकते.

विद्यालयाचे परिसरात इमारत क्रमांक 2 येथे तळ माळावरील सहा वर्गखोल्या पुढील सत्र सुरू होईपर्यंत उपलब्ध करून देण्यास ट्रस्टच्या समितीने होकार दिलेला आहे. प्रसाधनगृह, पाण्याची व्यवस्था सुद्धा ट्रस्टच्यावतीने करून घेण्याची ग्वाही दिलेली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण दवाखाना शोधण्यास शहरात फिरण्यास प्रतिबंध होईल . पॉझिटिव्ह असेल अशा रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात थांबण्याकरिता एक ट्रान्झिट कोव्हिडं सेंटर तयार झाले तर ते शहरातील गोरगरीब व ग्रामीण भागातील जनतेच्या फायद्याचे होईल. अशा प्रकारचा एक प्रस्ताव अनिल जवादे यांनी माननीय उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना पाठविलेला आहे . तसेच यासंदर्भात आज दि 1 मे रोजी माननीय सुनीलजी केदार साहेब, पालकमंत्री वर्धा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आणि त्यांचेसोबत चर्चा केली. यावेळी विदर्भ विकास आघाडीचे महेश माकडे, दिनेश वाघ, जयंत धोटे, अजय मुळे इत्यादी उपस्थित होते.