दुकानदारांनी आपली माहिती ग्रामसेवक यांच्याकडे द्यावी

24

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

खटाव(दि.4मे):-सातारा जिल्ह्यात आज पासून अत्यावश्यक सेवा वगळता शासनाच्या नियमावलीत असणाऱ्या काही दुकानदारांना अत्यावश्यक सेवेसाठी पास उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासंदर्भात स्थानिक पातळीवर ग्राम सेवक यांच्याकडे दुकानदारांनी आपली माहिती द्यावी असे आवाहन खटाव(वडूज) पंचायत समितीचे बीडीओ श्री काळे यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सर्व लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने सातारा जिल्ह्यात दहा तारखेपर्यंत टाळेबंदी चा निर्णय घेतला असून यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानदार त्यांचे कर्मचारी यांना घरपोच सुविधा साठी पास देणार असून संदर्भातील माहिती दुकानदारांनी दुकानाचे नाव ,मालकाचे नाव , कर्मचारी असल्यास त्यांचे नाव व मोबाईल नं बर अशी माहिती द्यावी असे आवाहन श्री काळे यांनी केले.