माधवराव बिन्नर यांचा सामाजिक उपक्रम

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

अकोले(दि.4मे):-अकोले तालुक्यातील मान्हेरे येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते माधवराव बिन्नर यांनी या कोरोनाच्या महामारीने जग त्रस्त झाले आहे म्हणून आपलाही थोडाफार सहभाग द्यावा यासाठी त्यांनी मान्हेरे गावातील सर्व नागरिकांना मोफत दळण देण्यासाठी आपली गिरणी खुली करून दिली आहे. त्यामुळे गावातील लोकांनी दुर न जाता आपले दळण मोफत दळून नेण्यासाठी सहकार्य केले आहे.आज गावबंदी असल्याने हाताला कामधंदा नाही हातावर जिवण जगणाऱ्या लोकांना कामधंदा नसल्याने उपासमार होत आहे.

म्हणून या समाजकार्यात आपलाही हातभार लागेल म्हणून माधवराव बिन्नर यांनी मोफत दळण देण्याची तयारी दाखवली या त्यांच्या कामाचे कौतुक तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड गावचे सरपंच हरीभाऊ गभाले सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोंडार सुरेश कांबळे गोविंद महाराज घोरपडे. भरतशेठ येलमामे संतोष गभाले माजी सरपंच बहिरु गभाले आशाताई गभाले आदिंनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत प्रत्येक गावातील उदार लोकांनी पुढे येऊन अशाप्रकारे मदत करावी असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED