त्या आपद्ग्रस्त कुटुंबास शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार :सखाराम बोबडे पडेगावकर

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4मे):-वीज पडून कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने उघड्यावर आलेल्या वंदन येथील होरगुळे कुटुंबियांस शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी वंदन येथे मंगळवारी दिली.

धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी मयत बालासाहेब होरगुळे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते रामेश्वर बचाटे पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयवंतराव कुंडगीर, राहुल साबणे आदीची उपस्थिती होती.
55 वर्षीय गंगाधर होरगुळे यांचा दोन दिवसापूर्वी रविवारी शेतात काम करत असताना वीज पडून मृत्यू झाला. मागील दहा वर्षापासून भंडारी यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला होते. अत्यंत गरीब परिस्थिती असलेले गंगाधर हे आपल्या कुटंबियांसमवेत गावातच राहत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. एक मुलगा अविवाहित आहे.

मुलाच्या लग्नापूर्वी स्वतःचे घर असावे म्हणून त्यांनी गावातीलच जुनी जागा नुकतीच विकत घेतली होती. पण ती जागा स्वतःच्या नावावर होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. मागील चार वर्षापासून वडिलांच्या नावे असलेली चार एकर शेती पैकी त्यांच्या हिश्याला येणारी एक यकर स्वतःच्या नावे करून घेण्यासाठीही ते व त्यांचे बंधू त्र्यंबकराव होरगुळे हे शासन दरबारी चकरा मारत होते .पण घरा च्या जागे सोबत शेती ही त्यांच्या नावे होऊ शकली नाही.

ही सर्व परिस्थिती ऐकून सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी त्यांची शेती व नवीन घेतलेली जागा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर करण्यासाठी पाठपुरावा करू व त्यासोबतच नैसर्गिक आपत्ती विभागातून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात सोनपेठ तहसीलदार बिराजदार यांच्याशी संपर्क साधून या कुटुंबास तात्काळ मदत मिळावे यासाठी काय करता येईल अशी चर्चा केली.यावेळी मयत गंगाधर यांचे भाउ त्र्यंबक होरगुळे , गोविंद होरगुळे, कल्याणराव बेद्रे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED