भारतीय पत्रकार संघटनेच्या नांदेड जिल्हा महासचिवपदी संदीप कांबळे

28

✒️नायगांव प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ)मो:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.६मे):- ( भारतीय कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड) संलग्नित भारतीय पत्रकार संघटनेच्या नांदेड जिल्हा महासचिवपदी दैनिक कुलस्वामिनी संदेश वर्तमानपत्राचे विभागिय संपादक संदीप कांबळे यांची निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल भारतीय कम्युनिस्ट पार्टी ( युनायटेड ) चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ. प्रा. सदाशिव भुयारे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड विखार शेख मरखेलकर, राज्य उपाध्यक्ष कॉ. प्रा . इरवंत सूर्यकर, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ. प्रवीणकुमार सेलूकर, नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ. अंबादास भंडारे, नांदेड जिल्हाउपाध्यक्ष कॉ. उमाकांत सूर्यवंशी, जिल्हामहासचिव कॉ. प्रा. देविदास इंगळे, नांदेड शहर प्रसिद्धीप्रमुख कॉम्रेड नितीन गादेकर, भारतीय पत्रकार संघटनेचे देगलूर तालुकाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गजलवार , बिलोली तालुका संघटक कॉम्रेड काशीनाथ वाघमारे, मुखेड तालुकाध्यक्ष कॉम्रेड उत्तम गालचलवाड, आदींनी अभिनंदन करून शुभेच्या दिल्या. संदिप कांबळे यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदना च्या वर्षावासह त्यांचे कौतुक केले जात आहे,