बँकाचे आर्थिक व्यवहार बंद असलेने रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी ससेहोलपट थांबवा – किशोर सोनवणे

44
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.6मे):-राज्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असंताना रुगणांना बेड,रेमडीसिविर इंजेक्शन मिळत नाहीत रुगणाची ससेहोलपट चालू आहे त्यातच म्हसवड शहरातील बॅकाचे आर्थिक व्यवहार बंद असलेने रुग्नाचे नातेवाईकांची पैसे जमवाजमव करताना कसरत होत आहे त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यासाठी शहरातील सर्व बँकाचे आर्थिक व्यवहार लवकरात लवकर सुरु करावेत अशी मागणी आर पी आय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे.

म्हसवड शहरात गेल्या चार आठवड्यापासून लॉक डाऊन असून शहरातील सर्व दुकाने बंद असून बँकाच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे ग्राहक वर्गाने बँकाचेकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे बँकेत होणारी गर्दीपन कमी झाली आहे तरीसुद्धा शहरात रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण वाढल्याने “ब्रेक द चेन” या मोहिमे अंतर्गत 21 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान शहरात कडक लॉक डाऊन लावण्यात आला त्यात नगरपालिकेने दिलेल्या नोटिशीमुळे शहरातील सर्व खाजगी,सरकारी बँका व पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या.त्यावेळी नागरिकांना आपल्या आर्थिक व्यवहारात अनेक अडचणींचा सामना करावा लागला रुगणाच्या नातेवाईकांना रुग्नासाठी लागणाऱ्या औषधोपचारासाठी पैसे मिळणे मुश्किल झाले त्यातच ए टी एम् मध्ये खडखडाट असल्यामुळे तिथून पण पैशाची गरज पूर्ण होत नव्हती.
त्यानंतर 1 मे पासून बँका सुरळीत चालू झाल्या नाहीत तोवर 3 मे पासून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवनशी यांनी सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला त्यात बँकाचा समावेश केल्यामुळे पुन्हा एकदा सर्वाना आर्थिक व्यवहाराच्या संकटास सामोरे जावे लागत आहे.गेली जवळजवळ 15 दिवस बँका बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार होत नसल्याने नागरिक चिडले असून त्याच्या सहनशीलतेचा अंत होत आहे आज कित्येक दिवस झाले लोकांचे व्यवसाय बंद असून दैनंदिन खर्चासाठी पैसे नाहीत थोडे फार पैसे खात्यावर आहेत ते पण काढता येत नाहीत तर लोकांच्या गरजा भागणार कश्या तरी प्राताधिकारी यांनी त्वरित नवा आदेश काढून सकाळी 11 ते 2 यावेळेत का होईना बँका चालू ठेवण्यास परवानगी द्यावी आणि लोकांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असे आर पी आय नेते किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे