चिमूर येथील पत्रकार संजय वरघने यांचे निधन

28

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.8 मे)- येथील पत्रकार संजय गणपतराव वरघणे( वय 48 वर्षे) यांचे आज (7 मे) रोजी दुपारी 1.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.दैनिक महाविदर्भ पासून पत्रकारितेचा प्रारंभ करून दैनिक लोकमत करीता चिमूर तालुका प्रतिनिधी म्हणून बरीच वर्षे त्यांनी काम केले होते.

दरम्यान सर्वोदय युवा संस्था ,चिमूर च्या सिकलसेल निर्मुलन प्रकल्पात त्यांनी काम केले होते.त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली,आई-वडील, तीन भाऊ व त्यांचा परिवार आहे.
चिमूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष पदावर त्यांनी काम केले होते