सामाजिक लोकशाही चे आधारस्तंभ ,आरक्षणाचे प्रणेते ,राजश्री शाहू महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंचीत तर्फे अभिवादन

25

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.7मे):- जिल्हा वंचीत बहुजन आघाडी ( पूर्व ) चे वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 99 व्या स्मृतिप्रीत्यर्थ आज मूख्य डाक कार्यालय ईमारती समोरील प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन देण्यात आले.
राजर्षी शाहू महाराजानी सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ,बहूजन समाजाच्या सामाजिक ऊन्नतीसाठी व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता सामाजिक परिवर्तनाचे महत्वाचे निर्णय घेतले व राबविलेत महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने एक महान समाज सुधारक लाभला..आणि देशात महाराष्ट्राची फूले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख झाली.

ह्या दूरदर्शी लोकनेत्याला अभिवादन देतांना जिल्हाध्यक्ष मा.लक्ष्मीकांत लोळगे, महासचिव ॲड.श्याम खंडारे, कोषाध्यक्ष अरूणराव कपीले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवदासजी कांबळे ,निलेश चचाणे,एस.एन श्रीरामे,चंद्रमणी लोखंडे, प्रविण बिचकूंडे,अविनाश राऊतआदि. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवदासजी कांबळे यांनी कळविले.