सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचेकडून निलेश काटे यांना “कोविडं योध्दा” म्हणून सन्मानित

58

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.7मे):-महाराष्ट्रातील सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली पहिली नोंदणीकृत संघटना ‘सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य’ यांचे वतीने सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस निलेश काटे यांना “कोविड योद्धा 2021” सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.निलेश काटे हे कोरोना काळात कोरोना रुग्णांना बेड रेमडीसीविर इंजेक्शन्स आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्या साठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

तसेच त्यांनी कोरोना काळातील लॉक डाऊन मध्ये अनेक गरजू लोकांना मदत केली गरिबांना अन्नदान केले याची दखल घेत सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने त्यांना “कोविडं योद्धा” म्हणून सन्मानित केले गेले.चांगले काम करणाऱ्या चा नेहमीच सन्मान केला जातो हे निलेश काटे यांना मिळालेल्या सन्मानावरून लक्षात येते.त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध राजकीय पक्ष राजकीय संघटना सामाजिक संघटना शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.