हिंगणघाट रा.सू.बिडकर महाविद्यालयाच्या चुकीच्या व्यवस्थापना मुळे विद्यार्थ्यांच्या जिव धोक्यात

33

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)

हिंगणघाट(दि.8मे):- रा.सू.बिडकर महाविद्यालय हिंगणघाटच्या व्यवस्थापनाकडून दिनांक 5/5/2021 ला पद्विशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल वर मेसेज पाठविण्यात आला.त्यात उन्हाळी 2021 परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू आहे व त्याचे अंतिम तारीख 10 मे 2021 आहे असे कळविण्यात आले.

माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्ग साखळी तोडण्या करिता दिनांक 8 ते 13 मे पर्यंत अत्यंत कडल लॉकडाऊन चा आदेश वर्धा जिल्ह्यात काढण्यात आला. हे विद्यार्थ्यांचे लक्षात येताच दिनांक 7/5/2021 शुक्रवारला महाविद्यालयात फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली विद्यार्थी संख्या व लॉक डाऊन चा आदेश याची कल्पना महाविद्यालयाला असूनही नियोजन अभावी कोरोना काळात गर्दी टाळता आली नाही.

सद्या स्थितीत ऑक्सिजन अभावी कोरोना संसर गाणे तरुणांचे प्राण जात आहे. जिल्ह्यात कोरूना संसर्ग चरम सीमेवर आहे त्यातच महाविद्यालयाकडून अशी विद्यार्थ्यांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचा ची बेजबाबदारपणाचे वागणूक निश्चितच निंदनीय आहे याच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे करण्यात आला.