चादंवङ ला रेमडीसीविर नावाखाली फसवणूक करणाऱ्यास 10 मे पर्यंत कोठडी

28

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि8मे):-चादंवङ उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर दोन संशयित व्यक्ती रेमडीसीविर नावाच्या इंजेक्शन नावाखाली काहीतरी विकत असल्याची कुणकुण चांदवड शहरात होती.चांदवडचे शिवसेना शहरप्रमुख संदीपभाऊ उगले,ब्लु पँथराचे पांडुरंग भडांगे ह्या सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी लक्ष ठेऊन तात्काळ पोलीस स्टेशनला कळविले व संशयित किरण साळवे रा मनमाड यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याचा दुसरा जोडीदार रोहित घरटे रा कल्याण हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. किरण साळवे यास न्यायालयात हजर केले असता 10 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून पुढील पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब वाळेकर तपास करत आहे