आनंदराव तुकाराम साबळे यांचे निधन

22

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8मे):-स्मृतिशेष *आनंदराव* *तुकाराम* *साबळे* यांचे दि.05/05/2021 बुधवार रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 66 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते रा. पिंपरी (झोला) ता. गंगाखेड जिल्हा परभणी येथील रहिवाशी होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी आयु. द्रौपदाबाई साबळे, तीन मुले- सूना प्रा.डॉ.बालाजी- पंचशिला, कैलास-शीतल, अँड. विजयकुमार, तीन मुली जावई आयु. वंदना सिद्धार्थ गायकवाड, आयु वंदना श्रीहरी गायकवाड, आयु.अनुराधा प्रकाश जंगले नातवंडे, बहिणी,असा मोठा परिवार आहे.

त्यांचे शिक्षण तिसरी इयत्ता पर्यंत असले तरी ग्रामीण भागात पारंपरिक टेलरिंग व्यवसाय करीत बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करून मार्गक्रमण केले शिक्षणाचे महत्त्व ओळखून सहा अपत्यांना शिक्षण दिले. एवढेच नाही त्यांची दोन मुले उच्च विद्या विभूषित आहेत. डॉ. बालाजी साबळे प्राध्यापक आहेत. आयु. विजयकुमार अडव्होकेट आहेत.

लव्हाराल ता. लोहा जिल्हा नांदेड येथून त्यांचे वडील तुकाराम साबळे १९४८ च्या सुमारास रोजगारासाठी स्थलांतरित झाले व पिंपरी येथे स्थायिक झाले ते आजतागायत. त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. समाजकारण राजकारण आणि धम्मकार्यात अग्रेसर राहून काम करीत असत. पिंपरी ग्रामपंचायत चे माजी सदस्य होते. दि. 05/05/2021 रोजी सायं. 5 वा. का. आनंदराव साबळे अनंतात विलीन झाले.