गैरकायदेशीर मार्ग शोधुन शेती हडप करित असल्यामुळे आरेगांव येथील शेतकऱ्याचे आत्मदहनकरण्याचा इशारा ?

88

✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.9मे):-येथील आरेगाव (खू)ता.पुसद जि.यवतमाळ येथील शेतकरी तथा फिर्यादी श्री विलास तूकाराम गायकवाड यांनी जिल्हा आधिकारी यवतमाळ यांना लेखी निवेदनाव्दारे आत्मदहन करीत असल्याचे निवेदनातुन इशारा दिला आहे,या बाबत सविस्तर वृत्त असे कि विलास गायकवाड हे शेतकारी असून त्याचा शेत सर्वे, नंबर १४१ क्षेञफळ दोन, आर,असुन या शेतीवर त्यांच्या कुटूबीयांचा उदार्निवाह करीत असतो शेतजमीन सावकार व्यवहारातून खोटी व बनावट खरेदी तयार करून सदर शेतजमीन हाडपण्याचा प्रर्यंत्न केला आहे, ही शेतजमीन शाशनाने संब्धीत शेतकऱ्याला स्वतःचा संसार उपजिवीकेसाठी बाहाल केलेली असुन त्यावर त्यांचा परिवार व्यवस्थीत व सुरळीत चालावा या करिता शासणानी प्रदान केलेली जमीन ही शेतजमीन वर्ग दोन ची होती.

परंतू तलाठी, व मंडळ, आधिकारी यांनी बनावट खरेदीदाराने बनावटच दस्तावेज तयार करुन त्या सातबाऱ्यावर वहितीदार वारस शांता राठोड यांच्याशी हात मिळवणी करून व संगनमत करुन सदर शेतजमीन ही वर्ग एक मध्ये परिवर्तित कशी केली व कधी करण्यात आली आहे,ही बाब शेतकारी विलास गायकवाड यांच्या निद्रशणास आल्याने त्यांनी सदर प्रकारावर प्रतिबंध घालण्यासाठी निवेदनाव्दारे आत्मदहन करीत आसल्याचा इशारा दिला आहे, या निवेदनावर श्री विलास गायकवाड यांची सही आहे आरेगाव येथील अन्याय ग्रस्त शेतकर्याला तात्काळ न्याय देण्यात यावा, आन्यथा लोकशाही र्मागाने आंदोलन करावे लागेल.

भिम पॅंथर न्यायाची डरकाळी सामाजिक संघटनेचा प्रशाशनेला इशारा पुसद येथील आरेगाव येथील शेतकरी विलास गायकवाड यांनी बनावट कागद पञाच्या आधारे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यया विरोधात न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशाशनाकडे निवेदनाव्दारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे, सदर बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्यामुळे जिल्हा प्रशाशनाने वेळीच दखल घेउन आन्याय ग्रस्त शेतकर्याला न्याय द्यावा आत्महात्या करण्या पासून त्यांना जिवन जगण्याची एक सामग्री साधन म्हणजे त्याची शेती त्यांच्या ताब्यात द्यावे आणी न्याय देऊन उपरोक्त करावे अन्यथा आरेगाव येथील बळीराज्याच्या न्यायहकासाठी भिम पॅंथर न्यायाची डरकाळी सामाजिक संघटना रस्त्यावर उतरेल आसा इशारा संघटनेचे भिमसैनिक संस्थापक भाऊसाहेब जगताप यांनी प्रशिध्दी पञाव्दारे इशारा दिला आहे,