राष्ट्रसंताचे निस्सिम उपासक दिवंगत नानाजी पा.डोंगे यांना आदरांजली अर्पण

29

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

राजुरा(दि.9मे):- अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळ तालुका राजुरा चे प्रचारप्रमुख आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य नानाजी पाटील डोंगे यांचे ८ मे रोजी प्रकृती अस्वास्थामुळे साखरी (वाघोबा) ता.राजुरा येथे दुःखद निधन झाले,ते ६८ वर्षाचे होते. स्थानिक श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे ते सेवाधिकारी होते.नानाजी पाटलांना सर्वजण भाऊजी म्हणत. राजुरा तहसिल कार्यालय परिसरात / कोर्टाच्या आवारात सदैव जनसेवेत तत्पर असणारा हा माणूस होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी विविध दाखले / प्रमाणपत्र हवे असते,तेव्हा अश्या गरजुंना मदतीचा हात पुढे करणारे त्यांना योग्य मार्गदर्शन देणारे हसमुख डोंगे पाटील हे वेगळेच व्यक्तीमत्व होते.

राजुरा तहसिल कार्यालय परिसरात सारेच जण त्यांना भगव्या टोपीवाले डोंगे पाटील म्हणून ओळखायचे.ते श्रीगुरूदेव विचारांशी समर्पित,तळमळीचे समाजसेवी व्यक्तीमत्व होते. श्रीगुरूदेव विचारांनी अनेक गांवे जोडणारा तो सच्चा प्रचारप्रमुख होता,अशा शब्दात राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने नानाजी पा. डोंगे यांना आभासी पध्दतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.याप्रसंगी सरचिटणिस ॲड. राजेंद्र जेनेकर,महेंद्र दोनोडे,भाऊराव बोबडे,प्रा. श्रावण बानासुरे,देवराव कोंडेकर,ईंजी.विलास उगे,सुभाष पावडे,चेतन ठाकरे,नामदेव पिज्दूरकर,अनिल चौधरी, मनोहर बोबडे, केशव दशमुखे, सदानंद बोबडे आदींनी त्यांच्याप्रती शोकसंवेदना प्रकट केल्यात.