कादवाची विक्रमी 5 लाख क्विंटल साखर निर्मिती 44 व्या गळीत हंगामाची सांगता

25

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

दिंडोरी(दि.10मे):-कादवा सहकारी साखर कारखान्याच्या  44 व्या गळीत हंगामाची सांगता झाली असून यंदा विक्रमी 4,44,157 मेंटन उसाचे गाळप होत पाच लाख क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.यंदा सातत्याने दर महिन्याला पडणारा पाऊस व मार्च पासून कोरोना प्रार्दुभाव या नैसर्गिक आपत्ती वर मात करत कादवाने विक्रमी गाळप केले आहे.नुकताच हंगाम संपला असून 177 दिवसात 4,44,157 मेंटन उसाचे गाळप होत 5.00,050 ,क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.सरासरी साखर उतारा 11.26 राहिला आहे. प्रतिदिन 1250 मेंटन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्यात येऊन गाळप क्षमता 2500 मेंटन करण्यात आली.

यंदा चे गाळप हंगामात कोरोनाचे सावट व सातत्याने हवामान बदल होत झालेल्या बेमोसमी पावसाचा मोठा फटका बसला मार्च मध्ये कोरोनाच्या प्रार्दुभाव वाढल्याने अनेक ऊस तोड मजूर कमी झाल्याने व आहे ते मजुरांची उन्हामुळे कार्यक्षमता कमी झाल्याने काही दिवस हंगाम लांबला .अनेक अडचणींवर मात करत अखेर 177 दिवसात हंगामाची सांगता झाली यावेळी चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते शेवटच्या ऊस मोळीचे पूजन करण्यात आले.

यावेळी शेटे यांनी हंगाम यशस्वी पार पाडत विक्रमी गाळप केल्याबद्दल सभासद,ऊस उत्पादक ,ऊस तोड कामगार,वाहतूकदार,कामगार अधिकारी यांचे आभार मानले.पुढे बोलताना शेटे यांनी केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही त्यामुळे इथेनॉल प्रकल्पाचे काम हाती घेतले असून आगामी हंगामापर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे कादवा ची गाळप कार्यक्षमता वाढली असून उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक उसाला भाव दिला जात असून जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन केले .यावेळी व्हा चेअरमन उत्तमबाबा भालेराव ,सर्व संचालक कार्यकारी  संचालक हेमंत माने ,सर्व अधिकारी कामगार उपस्थित होते.