रमजान ईद मुस्लिम समाजाने अत्यंत साधेपणाने साजरी करावी – रफिक पठाण

28

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.11मे):-गेल्या दीड वर्षापासून आपल्या भारता देशासह जगभरात कोरोनाविषाणू या महामारीने थैमान घातले असून आतापर्यंत या महामारीत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. यामाहा मारीचा सुरुवातीपासून लाॅकडॉन परस्थीती असल्याने सर्व व्यापार ठप्प आहेत गोरगरीब मजूरांच्या हाती काम नाही गरीब गरीब लोकांचे जेवणासाठी हाल होत आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी नेहमीच लोकांच्या कामी येण्याची व सहकार्य करण्याची परंपरा अभादीत ठेवली आहे.या वर्षी रमजान ईद येत्या १४ मे रोजी आपल्या देशात साजरी होणार आहे राज्यभरात शासनाने खडक निर्बंध लावले आहेत तसेच बीड जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी यांनी लाॅकडॉन जाहीर केला आहे.

सर्व दुकाने बाजारपेठ बंद असून प्रशासनामार्फत लोकांना घरी रहाण्याविषयी व कोरोनाविषाणू वर नियंत्रण करण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या विविध आदेशांची अंमलबजावणी करण्याविषयी सूचना देण्यात येत आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांनी गेल्यावर्षी सारख्या या वर्षीसुद्धा रमजान ईद घरीच राहून अत्यंत साधेपणाने साजरी करावी वहीची नमाज आपल्या घरीच आधार करावी तसेच लॉकडाउन मुळे गोर- गरीब लोकांचे अत्यंत हाल होत असून या लोकांना मदत करावी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत करावी तसेच कोणीही कोणत्याही धर्माचा समाजाचा एकही माणूस उपाशी राहू नये यासाठी सर्वांनी गोरगरीब लोकांमध्ये किराणा वस्तू जीवनावश्यक वस्तू वाटप करावे व अशा परिस्थितीत सुद्धा सर्वांची ईद गोड करण्याचे प्रयत्न करावे असे आव्हान अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समिती चे बीड जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष रफिक पठाण यांनी केले आहे.