फलटण तालुक्यामध्ये प्लाझ्मा उपलब्ध व्हावा – निवृत्ती खताळ ( सर )

21

✒️फलटण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

फलटण(दि.12मे):- फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालेला आपणा सर्वांना दिसत आहे त्यात काही पेशंटचा स्कोर जास्त आणि आँक्सिजन लेवल कमी असल्यामुळे त्या पेशंटला प्लाम्झा ची गरज पडत आहे व तो प्लाम्झा फलटण तालुक्यामध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांना पुणे, इंदापुर, पंढरपुर अशा बाहेर ठिकाणी जावे लागत आहे त्यामुळे ते प्लाझ्मा आणण्यासाठी गेले असता प्लाझ्मा काही ठिकाणी मिळतो.

तर काही ठिकाणी २/४ दिवस वेटिंग करावे लागत आहे त्यामुळे काही पेशंट आपला जीव सोडत आहेत त्यामुळे प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपापल्या गावामध्ये बल्ड डोनेट कँम्प घ्यावेत अशी विनंती फलटण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना निवृत्ती खताळ ( सर ) अध्यक्ष फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय विभाग फलटण यांनी केली आहे.