पेट्रोल व डिझेल इंधनाची दरवाढ सुरूच पुन्हा उच्चांक गाठला आहे

30

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12मे):-दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत परभणी जिल्हात रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राज्यातले नव्हे तर देशातले सर्वात महाग पेट्रोल सध्या परभणी जिल्हात घ्यावे लागत आहे.देशातील महाग पेट्रोल या परभणी’ जिल्हात मिळत आहे. पुन्हा एकदा परभणी जिल्हात पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे या किंमती मुळे परभणी जिल्हा चर्चेत आला आहे. परभणी जिल्हात बुधवारी पेट्रोल देखील शंभरीच्या (१००.७० पैसे)वर गेले आहे. डिझेलच्या दराचासुद्धा भडका उडाला असून, डिझेल ९०.६७ पैसे लिटर प्रमाणे परभणी जिल्हात नागरिकांना खरेदी करवे लागत आहे या मुळे त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत.

परभणी जिल्हात पेट्रोल दरवाढीचा पुन्हा उच्चांक; देशात सर्वात महाग असूननिवडणुकांचा निकाल लागताच दर वाढण्यास सुरू झाली आहेपाच राज्यातील निवडणुकां होताच पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्यास सुरू झाली आहेत. गेल्या ५ ते ६ दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. ८ मे रोजी १०० रुपयांच्या आत असलेले पेट्रोलचे दर ९ मे रोजी १००.१ रुपये झाले त्यानंतर १० रोजी १००.२६ तर ११ रोजी १००.५१ पैसे तर आज १२ मे रोजी त्यात २४ पैश्यांची वाढ होऊन १००.७० पैसे प्रति लिटर एवढा पेट्रोलचा दर झाला आहे. परभणी जिल्हात वाहचलकांचा गेल्या काही दिवसात इंधनाचे भाव झपाट्याने वाढत असल्या मुळे आहेत. या भावाढीचा अन्याय केवळ परभणी जिल्हात का? असा प्रश्र्न वाहनचालक उपस्थित करत आहेत. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे.

लोकांना आधीच रोजगार नाही, त्यात इंधन दरवाढीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, अशी भावना वाहनचालकांनी व्यक्त केली. काहींनी केंद्र सरकार पेट्रोल दरवाढीच्या माध्यमातून नागरिकांना लुटत असल्याचा आरोप देखील केला.डिझेल दरवाढीने मालवाहतूक महागली -पेट्रोल प्रमाणेच डिझेलच्या भावात (९०.६७ पैसे)देखील वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक महागली आहे. भाजीपाला, धान्य यांची दरवाढ सुरू झाली आहे. भाज्या महागल्या, धान्याचे दरही वाढले, बहुतांश ऑटोरिक्षा पेट्रोल व डिझेलवर चालतात. त्यामुळे प्रवाशी वाहतुकीची दरवाढ सुरू झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुक, दळणवळण, व्यापारी आणि प्रवास यावर वितरीत परिणाम झाला आहे. ही इंधन दरवाढ रोजच होत असल्याने याचा परिणाम इतर वाहतुकीवर होत आहेत. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी करत होत आहे