आजाद समाज पार्टीचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना निवेदन

35

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15मे):-महाविकास आघाडी सरकारने नुकतेच मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द केले.हा मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचारावर अन्याय आहे.सूड भावनेतून रद्द केलेले पदोन्नती आरक्षण तात्काळ पूर्ववत करावे.अन्यथा महाराष्ट्र सरकारला याचे परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागतील.तसेच मागासवर्गीय समितीच्या अध्यक्ष पदी मराठा नेते असलेले अजित पवार साहेब यांची पदाऊन हक्कालपट्टी करावी.तसेच अजित पवार यांच्या बंगल्यासमोर भीम आर्मी व आजाद समाज पार्टीच्या कार्येकर्त्यांनी निदर्शने केली होती.परंतु पोलीसानी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले.

निदर्शने करणे हा हक्क आहे. पण तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले हे चुकीचे आहे.ही दडपशाही आहे.त्यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे.या मागणीची दखल न घेतल्यास जनआंदोलन उभे करण्यात येईल व उदभवलेल्या परिस्थितीस महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल.अश्या आशयाचे निवेदन मा.उपविभागीय आधिकारी साहेब पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांना देण्यात आले.

या निवेदनावर आजाद समाज पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांची स्वाक्षरी आहे.