सातारा पोलीस स्टेशन व सातारा जिल्हा कारागृह परिसराचे मल्टी पेस्ट कंट्रोलच्यावतीने मोफत सॅनिटायझेशन

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.15मे):-कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारे पोलीस सुरक्षित रहावेत यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या मल्टी पेस्ट कंट्रोल कंपनीच्या वतीने सातारा शहर पोलीस स्टेशनचे संपूर्ण व जिल्हा कारागृह परिसराचे सामाजिक भावनेतून मोफत सॅनिटायझेशन करण्यात आले.

सध्या देशासह सर्वत्र कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. अशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझेशनची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण हात सॅनिटायझरने अथवा हॅण्ड वॉशने स्वच्छ करत असतो. मात्र, आपले संपूर्ण कार्यालय अथवा घर सॅनिटायझ करणे प्रचंड क्लिष्ट प्रक्रिया आहे. त्यामुळे अनेक जण चिंतेत असताना आता विशेषतः सातारा जिल्ह्यातील नागरिक व व्यावसायिक वर्गाची चिंता मिटली आहे. साताऱ्यातील मल्टी पेस्ट कंट्रोल ही कंपनी आता अत्यंत माफक दरात सातारकरांना सेवा देण्यासाठी पुढे आली आहे.

एवढेच नव्हे तर कोरोना काळात प्रशासकीय व सामाजिक कार्य कार्य करणाऱ्या संस्थांचे मोफत सॅनिटायझेशन करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे नुकतेच शनिवारी सकाळी सातारा शहर पोलीस स्टेशनचे संपूर्ण व जिल्हा कारागृह परिसराचे सामाजिक भावनेतून मोफत सॅनिटायझेशन करण्यात आले. त्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने मल्टी पेस्ट कंट्रोल कंपनीचे संचालक अक्षय भोसले यांचे व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

दरम्यान, औद्योगिक वसाहत परिसरात मल्टी पेस्ट कंट्रोल कंपनी उभारण्यात आली आहे. मागील २० वर्षापासून ही कंपनी जिल्ह्यातील नागरिकांना पेस्ट कंट्रोलची खात्रीशीर सेवा देत आहे. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने ह्या कंपनीने कोरोना सॅनिटायझेशन प्रक्रियेत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक सर्व सामुग्री परदेशातून आयात केली व पुढे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नामांकित रुग्णालये, शासकीय तसेच खासगी कार्यालये आणि कोविड सेंटरला खात्रीशीर सेवा ही कंपनी देत आहे. त्याचबरोबर यंदा घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने पुढे बरे झाल्यानंतर संपूर्ण घर तांत्रिक दृष्ट्या सॅनिटायझ कसे करायचे ? असा प्रश्न नागरिकांना पडला होता.

मात्र, मल्टी पेस्ट कंट्रोल कंपनीने सॅनिटायझेशन प्रक्रियेत उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिकांची चिंता मिटली आहे. मल्टी पेस्ट कंट्रोल कंपनीचे संचालक अक्षय भोसले व त्यांचा सहकारी कर्मचारी वर्ग गेल्या वर्षभरापासून
सर्व धोका पत्करून नागरिकांना अहोरात्र सेवा देत आहेत. एखाद्या घरातील अथवा कार्यालयातील  रुग्ण बरा होण्यासह तेथील सॅनिटायझेशन देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे सातारकरांनी सॅनिटायझेशनची चिंता सोडून द्यावी व फक्त मल्टी पेस्ट कंट्रोल कंपनीचे संचालक अक्षय भोसले यांना 8855030226 ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क साधताच सातारा शहरात काही मिनिटात तर जिल्ह्यात काही तासात मल्टी पेस्ट कंट्रोल कंपनीचे कर्मचारी हजर होतील, असे कंपनीचे संचालक अक्षय भोसले यांनी सांगितले.