कोविड बाधित प्रत्रकारांना खाजगी रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्या

32

🔸ब्रम्हपूरी तालुक्यातील प्रत्रकारांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.16मे):- ब्रम्हपूरी तालुक्यातील प्रत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता केवळ जनसामान्यांच्या हितासाठी आपल्या लेखणीतून शासन व प्रशासन यांनी राबविण्यात आलेल्या उपाययोजना आपल्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्याचे प्रत्रकार करित आहेत.कोणताही प्रकारच्या आर्थिक मोबदला मिळत नसताना सुद्धा कोरोना काळात सुध्दा आपली लेखणी कमी पडू दिली नाही.

तालुक्यातील अनेक प्रत्रकारांना कोविड बाधित झाले व एकाला जीव गमवावे लागले.काहिना व्याज दराने पैसे काढावे लागले आहे.प्रत्रकार हतबल झाला आहे.पण लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रत्रकारांना कडे मात्र शासनाचे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे.प्रत्रकार हे सर्वसामान्य परिवारातील सदस्य आहेत.खाजगी रुग्णालयात त्यांना योग्य उपचार मिळवा व उपचारासाठी येणारा खर्च हा शासनाने भरावे यासाठी ब्रम्हपूरी तालुक्यातील प्रत्रकारांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली . यावेळी जेष्ठ प्रत्रकार जिवन बागडे,दत्तात्रय दलाल, गोवर्धन दोनाडकर,अमर गाडगे,नंदु गड्डेवार, नेताजी मेत्राम ,रवि चामलवार आदी उपस्थित होते.