नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना काळ आणि बारावी बोर्डाची परीक्षा विषयावर मार्गदर्शन शिबीर

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

तुमसर(दि.16मे):-स्थानिक न.प.नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात बारावी बोर्डाची परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी कोरोना काळा सोबतच बोर्डाच्या परीक्षेला कसे सामोरे जाता येईल या बद्दल प्राचार्य श्री. भारत थोटे सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रा. संजय लेनगुरे, श्री. रमेश बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक चंद्रपूर येथील डॉक्टर सौ. अभिलाषा राकेश गावतुरे (बालरोगतज्ञ) यांनी बारावीचे हे वर्ष जीवनातील टर्निंग पॉईंट असून विद्यार्थ्यांनी अतिदक्ष असणे काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे मूर्तीला स्वतः तयार होण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ती क्षमता अंगी बाळगावा पाहिजे असे मत व्यक्त केले.

कोरोणा काळात प्रत्येक व्यक्ती हा प्रयत्नवादी असला पाहिजे तरच कोरोना वर मात करता येईल! कारण युरोपीय देश हे दैववादी नसून प्रयत्नवादी आहेत त्यामुळे त्या देशांनी कोरोनावर लवकरात लवकर मात केली आहे. तसेच त्यास पळविण्यासाठी दररोज व्यायामा सोबत सकस आहाराकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे .त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढत असून कोरोणाचा त्यावर काहीही प्रभाव पडणार नाही असे प्रभावी मत व्यक्त डॉ. गावतुरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्रा. संजय लेनगुरे यांनी कोरोना काळात बारावीचे विद्यार्थी हे द्विधा मनस्थिती मध्ये असून त्यांचा अभ्यासावर कोणताही परिणाम पडू नये करिता कोरोना काळातच त्यांचा अभ्यास कसा झाला पाहिजे व आपले ध्येय गाठता यावे या करीताच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यामागचा हेतू आहे असे स्पष्ट केले.कार्यक्रमाचे संचालन मंथन बडवाईक यांनी तर आभार कु.भारती बघेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता वीरेंद्र मुळे, प्रशांत रहांगडाले, क. शुभांगी पटले ,शुभांगी किरपाने, दामिनी पटले, रूपाली राऊत, श्रुती मानापुरे, चैतन्या खुणे ,स्वाती गौपाले ,कुणाल बांडेबुचे, गुलशन गौपाले ,युगेश बारागौने, सायली मोहतुरे , अंजली मसर्के, दीक्षा लांजेवार, श्वेता शेंडे, नेहा पारधी, पायल आकरे, यांनी अथक परिश्रम घेतले.