पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या तिरडीचा सौदा करू नये

23
✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये वैचारिक विरोधाभास असल्यास गैर नाही, आधीच कृषी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या जाचक कायद्याविरोधात देशातील असंख्य शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करता करता मृत्युमुखी पडले त्यातच करोणा सारख्या महाभयंकर महामारी असतांना इंधन व कृषी क्षेत्रातील केलेली दरवाढ ही अवाजवी व असुरी प्रवृत्तीने शेतकरी वर्गावर सुलतानी मानसिकतेतुन लादलेली आहे.

भाजपा खासदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष हे अद्याप केंद्राच्या धोरणांवर अनभिज्ञ आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो, वास्तविक शेतकर्याप्रति संवेदनशील भुमिका घेतांना स्वतःच्या सद्दविवेकबुध्दीचं पाईक असणं आवश्यक आहे असो भाजप पक्षात टिकून राहण्यासाठी स्वतःचे प्रामाणिक मतप्रदर्शन करण्याच्या अधिकाराच्या चाव्या दरबारातील दिवाणजींच्या ताब्यात जमा असतील तर मुक्त विचार , स्वैराचाराअभावी जगणं दुर्दैवी व वास्तविकतेची अपेक्षा करणं दुर्मिळ आहे . वस्तुतः ” मुके मजूर आज नरम शब्दात गरम चहा पिऊन काहीतरी साध्य करण्याचा निष्फळ अपयशी प्रयत्न करत आहेत.
“सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ” हे एकमेव सुत्र भाजपाचे असले तरी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर असली दिशाभूल करणे निंदनीय आहे, अर्थात ही राजकारणाची वेळ नाही मात्र खतांच्या किंमतीसंदर्भात हा विषय केंद्र सरकारच्या अत्यारीत असतांना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. पाटील यांनी वर्तमान पत्रात व्यक्त केलेले मत शेतकरी पुत्रांचे मस्तक भिरवून सोडणारं आहे तथा “अज्ञानी” न म्हणता तद्दन दिशाभूल करणारं व वेदनादायी आहे ,