दौंड तालुक्याला मंत्रीपद मिळणार-अँड.नयना गवळी (प्रदेश अध्यक्षा महिला रयत शेतकरी संघटना)

112

✒️दौंड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

दौड(दि.20मे):-महाराष्ट्रामध्ये रयत शेतकरी संघटनेना ही तळागाळात जाऊन शेतकऱ्यांसाठी काम करत असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजार भाव मिळावा,शेतकऱ्यांची वीज बिल व कर्ज माफ व्हावे, दुधाला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून संघटनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांच्या मागण्यांना वाचा फोडण्याचे काम संघटनेने केलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटने पेक्षाही सर्वात मोठी रयत शेतकरी संघटना असून आज रोजी संघटनेचे महाराष्ट्रभर तीस जिल्हाध्यक्ष काम करत आहेत.

आज रोजी जारी विधानसभेची निवडणूक झाली तर संघटनेचे कमीत कमी चार ते पाच आमदार निवडून येतील अशी परिस्थिती आसून महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याची ताकद संघटनेमध्ये तयार झाली असल्याकारणाने विविध पक्षांचे नेतेमंडळी संपर्कात असून महाराष्ट्राचे अध्यक्ष अँड. रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांना आम्ही विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिपद देऊ तुम्ही आमच्या सोबत राहा आशा स्वरूपाच्या मागण्या विविध पक्षांकडून येत आहेत, त्यामुळे दौंड तालुक्याला रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या रूपाने भविष्यामध्ये मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

असे मत रयत शेतकरी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष अँड. नयनाताई गवळी यांनी पैठण येथे झालेल्या महिला बैठकीमध्ये आपले मत व्यक्त केले बैठकीत उपस्थित कार्यकर्ते प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर प्रदेश कार्यअध्यक्ष तय्यब सय्यद पटेल *महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा पूजाताई उदगट्टे* , प महाराष्ट्र अध्यक्षा राणी ताई चौहान सांगली जिल्हा प्रमुख रेखाताई माळी,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष ईसाक भैया पटेल तालुकाध्यक्ष शंकर सातपुते मराठवाडा सरचिटणीस त्रिंबक नांगरे युवा पैठण तालुका अध्यक्ष सन्दीप मिसाळ दिपक भवरे महिला पिपळवाडी अध्यक्ष अशोक मिसाळ सर्कलअध्यक्षा निर्मला मिसाळ नशिम शेख रत्नंमाला रगडे ताई रुपालीताई लोहगळे मूनाबाई शेख निर्मला ताई बान्डे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील शेतकरी संघटनेतर्फे बळीराजाच्या मदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले