गावामध्ये कोरोनाचे पेशंन्ट वाढत आहेत, तरीपण या ‘उनाड’ पाच-सहा मुलांचा घोडका करुन बसणं सुरुच

27

✒️धामणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धामणगाव रेल्वे(दि.20मे):-सध्या चालु असलेल्या ‘कोरोना’ महामारी ने जगात हाहाकार माजवला आहे.
व तसेच अनेकांचे त्यांच्या परीवारातील प्रियजन या माहामारी मुळे या जगातुन निघुन सुद्धा गेले आहेत, काही लोक ईतकी घाबरलेली आहेत, जसे काही या महामारी मध्ये संपुर्ण जगातील लोकच मरण पावेल. शासन आपल्याला वारंवार सांगुन सुद्धा आपण शासनाच्या नियमांवर काना डोळा करीत आहे असे दिसुन येत आहे. सदर घटना ‘अंजनवती’ येथील आहे.

काही दिवसांपुर्वीच गावतील मुख्य रस्ते 4-5 दिवसापुर्वी पुर्ण सील करुन गावामध्ये दवंडी देण्यात आली की, “विना मास्क फिरणे व तीन पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी आल्यास अमुक अमुक दंड..!” व तसेच गाव ‘Hotspot’ घोषीत असुन सुद्धा गावामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट निघत अाहेत, गावामधील खुप लोक तर आपापल्या घराबाहेर निघायच्या वेळी हजार वेळा विचार करत आहेत, तसेच घराबाहेर जायच्या वेळी तोंडाला मास्क लावुन निघत आहे पण ईथे तर प्रकार वेगळाच..!
अंजनवती येथील एका वस्तीत म्हणजे “चौधरीपुरा” येथे हि 5-7 मुले व गावातील इतर मुलांना बोलावुन एका ठिकाणी येवुन गेली.

“1-2” महीन्यापासुन “तोंडाला मास्क न लावुन” व “सोशल डिस्टंसिंग” चा वापर न करता ‘मोठ्या आवाजाचा’ वापर करुन मोबाईल वरील एक विशिष्ठ मोबाईल गेम खेळतात तेही सकाळी दिवस निघाल्या पासुन ते 1-2 वाजेपर्यंत व रात्री सुमारे 11/11:30 वाजे पर्यंत, विशेष म्हणजे त्यांच्या संभाषणात मोठ्या आवाजात अश्लिल शब्दांचा वापर सुरु असतो व त्यांच्या वाईट अश्लिल शिव्यांमुळे व त्यांच्या बसुन टळाळक्या करण्यामुळे तेथील महीला व किशोरवयीन मुली सुद्धा घराबाहेर पडण्यास भित आहे व लहान मुले सुद्धा घराबाहेर जाण्यास भित आहे, काही दिवसांपुर्वी गल्लीतील महीलांनी व प्रतिष्ठीत नागरिकांनी त्यांना बसण्यासाठी विरोध केला असता त्यांनाच “उलट-सुलट” उत्तरे देत होते.

एका दिवशी तर या मुलांना हकलण्या करीता गेले पहील्या वेळी एका व्रुद्ध महीले न त्यांना बसण्याचा विरोध केला व त्यानंतर तिथल्या जागेवरुन त्याच गल्ली दुसरीकडे बसणे चालु केले व तिथेही त्यांच्यातील एक “दर्शन गजानन चौधरी” याने वय 75 वर्षाच्या वयोव्रुद्धा सोबत चांगले तडक्याचे भांडण केले. पण हे तरी सुद्धा हि “शिक्षीत बदमाश मुले” ऐकण्याचे नाव घेत नाही, यांना जर आपण ‘ईथे बसु नका’ म्हटले असता ते मुल उलट सुलट उत्तरे देतात व म्हणतात “हि जागा तुझ्या बापाची आहे का? किंवा “आम्ही कोणाच्या बापाच्या जागेवर नाही बसलो आहे”. सदर मुलांची नावेपुढील प्रमाणे आहेत.

“संदेश विजय वाळके ( वय18 वर्ष पुर्ण), निखील राजेंन्द्र वाळके ( वय 18 वर्ष पुर्ण), प्रज्वल विठ्ठल राऊत (वय 18 वर्ष पुर्ण ), महेश मनीराम चौधरी ( वय 17 वर्ष चालु), दर्शन गजानन चौधरी (वय 18 वर्ष चालु)”.हे सर्व मुले वय वर्ष 17/18 पुर्ण वयोगटातील आहेत व गावातील ईतर ‘उनाड’ मुलांना फोन करुन ईथे बोलावत होते ,विशेष म्हणजे या मुलांचे पालक सुद्धा त्यांना काही म्हणत नाही उलट ज्यांनी यांचा विरोध केला त्यांच्याच सोबत भांडतात तरी सदर मुलांवर व त्यांचा पालकांवर खुप कठोर कार्यवाही करावी हिच आस तेथील स्थानिक गल्लीतील लोक करीत आहेत, तरी सदर गावातील “अंजनवती ग्रामपंचायत”,”कुर्हा पोलीस स्टेशन कुर्हा”, “तहसील कार्यालय धामणगांव रेल्वे” यांनी सदर “उनाड” मुलांवर यांच्यावर काही “मोठी घटना” किंवा “अनपेक्षीत घटना” होण्या आधीच त्यांच्यावर “गुन्हा नोंदवुन” कडक कार्यवाही करावी हिच सदर गल्लीतील लोकांची तीव्र ईच्छा आहे.