हणेगाव येथे राज्य शासनाचा मोफतचे धान्य वाटप

31
✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.२०मे):-कोरोना महामारीने गरीब जनतेची हालअपेष्टा वाढत चालली असताना,व आणखीन कोरोनाचे पेशंट वाढत असल्याचे चाहूल पडताच राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊनची मुद्दत वाढवून १जून २०२१ अशी केली आहे.लॉकडाऊनची तारीख वाढली म्हणजे गोरगरीबांच्या हातावरचा पोट उघड्यावर आला.त्यातच राज्य शासनाने एक महिण्याचा गहू,तांदूळ(अन्न धान्य) मोफत देण्याचे जाहिर केले.
हणेगाव येथील श्री शरणप्पा महारूद्रप्पा उप्पे हणेगाव दु.क्र.३० या दुकानात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना मोफत वाटप करीत आहेत. शेतकरी लाभार्थ्यांना रेगूलरचे वाटप चालू आहे.

यावेळी हणेगाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ.वैशाली विवेक पडकंठवार यांचे पती ग्रामपंचायत सदस्य विवेक पडकंठवार, पत्रकार किशोर आडेकर, प्रविण इनामदार, निजाम इनामदार हे उपस्थित होते.यावेळी विवेक पडकंठवार यांनी सर्व कार्डधारकांना एकच आवाहन केले कि सध्या परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यामुळे प्रत्येकानी मास्क वापरा, सॕनिटायझरचा वापर करा, बाहेरून घरी गेल्यावर हात पाय साबनाने धुवून घरी जा.व काही अडचन आल्यास आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे बोलून वाटपास चालू केले.