शेकपुर बामर्डा वडनेर रस्ता अवैध रेती वाहतुकीने गेला खड्ड्यात

51

🔸सात दिवसात रस्ता दुरुस्त नाही केल्यास आंदोलन करणार- अक्षय इंगोले

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.25मे):-मागील २ महिन्या पासून वडनेर ते शेकपूर रस्त्यांनी रोज शेकडो तीप्पर रात्र दिवस वाळूची वाहतूक करत आहेत आणि याकडे प्रशासन संपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत.अशातच आता सामान्य जनतेसाठी आणखी मोठी समस्या या रेती वाहतुकीने उभी केली आहे. संबंधित रस्ता २ महिन्यापूर्वी गड्डा मुक्त रस्ता होता आणि त्यानंतर अचानक रेतीचे ट्रक वाहतूक सुरू झाली आणि आता मोठं मोठाले गड्डे पडून संपूर्ण रस्ता गड्ड्यात गेल्याच दिसून येत आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार त्यानंतर हेच गड्डे सामान्य जनतेसाठी जीवघेणे ठरणार.

तसेच या गड्ड्यामुळे जर कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न ग्रामस्थांचा वतीने विचारल्या जात आहे.पहिलेच रेतीचे भरधाव तीप्पर मुळे या रस्त्यावर नियमित अपघात घडत असल्याचे घडून येत असल्याचे दिसून येत असताना त्यात आता गड्ड्याची भर पडल्यामुळे सामान्य जनतेनी यातून वाट कशी काढायची हे सुद्धा तालुका प्रशासनाने सांगायला हवे. तसेच ही संपूर्ण परिस्थिती येत्या ७ दिवसात लक्ष घालून ठिक नाही केल्यास वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चे जिल्हा संघटक अक्षय इंगोले आणि परिसरातील संपूर्ण ग्रामस्थांचा वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे