चंद्रपूर जिल्ह्यात (दि.25मे) रोजी 24 तासात 960 कोरोनामुक्त, 234 कोरोना पॉझिटिव्ह तर 13 मृत्यू आतापर्यंत 75,483 जणांची कोरोनावर मात

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 960 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 234 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 13 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 81 हजार 512 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 75 हजार 483 झाली आहे. सध्या
4 हजार 627 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 59 हजार 496 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 75 हजार 89 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील रामपूर येथील 55 वर्षीय पुरुष, तुकूम परिसरातील 72 वर्षीय महिला, 48 ,50 व 72 वर्षीय पुरुष.बल्लारपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 65 वर्षीय महिला. गोंडपिपरी तालुक्यातील इंदिरा नगर येथील 85 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 80 वर्षीय पुरुष. तर गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1299, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 47, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 234 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 80, चंद्रपूर तालुका 24, बल्लारपूर 21, भद्रावती 14, ब्रम्हपुरी 02, नागभिड 12, सिंदेवाही 04, मूल 08, सावली 02, पोंभूर्णा 03, गोंडपिपरी 02, राजूरा 22, चिमूर 02, वरोरा 11, कोरपना 20, जिवती 05 व इतर ठिकाणच्या 02 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 235 कोरोनामुक्त, 2 मृत्यूसह 143 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.25मे):- आज जिल्हयात 143 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 235 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28906 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26687 वर पोहचली. तसेच सद्या 1520 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 699 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 2 नवीन मृत्यूमध्ये 71 वर्षीय पुरुष विसापूर गडचिरोली, 68 वर्षीय पुरुष व्याहाड ता.सावली जि.चंद्रपूर याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.32 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.26 टक्के तर मृत्यू दर 2.42 टक्के झाला.

नवीन 143 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 39, अहेरी तालुक्यातील 25 आरमोरी 5, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 9, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 5, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 11 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 4 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 235 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 69, अहेरी 36, आरमोरी 18, भामरागड 03, चामोर्शी 42, धानोरा 10, एटापल्ली 5, मुलचेरा 7, सिरोंचा 16, कोरची 3, कुरखेडा 5 तसेच वडसा येथील 21 जणांचा समावेश आहे.