ब्रम्हपुरीत नवे ठाणेदार रोशन यादव रुजू

28

🔸तालुक्यातील अवैध धंद्यावर अंकुश ठेवणार काय ? याकडे ब्रम्हपुरी वासियांच लक्ष

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.31मे):-ब्रम्हपुरीत नवे ठाणेदार रोशन यादव रुजू ,आठवड्या पूर्वी ब्रम्हपुरीचे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे यांची जिल्हा पोलीस निरीक्षक अरविंद साळवे यांनी तडकाफडकी बदली केली त्या ठिकाणी चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांची ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काल दि. 27ला त्यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला . नवनियुक्त ठाणेदार रोशन यादव हे आपल्या कारकिर्दीत तालुक्यातील अवैध धंद्यावर अंकुश ठेवणार काय ? हि अपेक्षा सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.