अल्पवयीन मुलीचा विनयभंग व अॅट्रॉसीटीसह गुन्हा दाखल

26

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.31मे):-शहरातील रजा कॉलनी येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन अत्याचार करण्याचा प्रयत्न करनाऱ्यावर गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.दि. 28 मे2021 रोजी दुपारी 3:30 ते 4:00 च्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी रडत रडत येवुन आईला म्हणाली की तोहीत मुजीब ऊर्फ इलीयास याच्या घरा समोरुन खेळुन आपल्या घरी जात असताना नराधम आरोपीने पिडीतेला घरात बोलवुन अंगातली पॅंन्ट काडुन धरपकड करत होता.

या मुळे पिडीत जोरात ओरडली तेव्हा आरोपीने तिला सोडुन देत बाहेर कोणाला काही सांगु नको म्हणून सोडुन दिले या मुळे पिडीतेच्या आईने मुलीच्या विनय भंगाची तक्रार गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल केली आरोपी तोहित मुजीब ऊर्फ इलीयास याच्या वर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह कलम 354 A 3. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक 8,12.सह दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस उपधिक्षक मिंलिद खोडवे हे करत आहेत .