प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वि जयंती जल्लोषात साजरी

34

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.३१मे):-प्रहार दिव्यांग संघटना नांदेड शाखा कुंटूर च्या वतीने दानशूर, कर्तृत्ववान,धर्मपरायन व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वि जयंती कुंटूर येथील आंबटवाड यांच्या निवासस्थानी शासनाचे प्रोटोकॉल पाळून साजरी करण्यात आली. यावेळी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व नारळ फोडून, भंडार्याची उधळण करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सहसचिव चांदू आंबटवाड, कुंटूरचे शाखा प्रमुख मल्हारी महादाळे, बालाजी डोके, तेजेराव पिंपळे, अशोक वाघमारे, गणेश कदम,पिराबाई वाघमारे, गंगाबाई आंबटवाड, शिवनंदा आंबटवाड, धुरपता बहिरे, रामदास बहिरे, रामा शिगळे, गोविंद शिगळे, संभाजी गुंठे,प्रमेश्वर बहिरे, काशीनाथ नागेश्वर व ईतर दिव्यांग बांधव हजर होते.