पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरू

40

🔹मुंबईतही रिपाइं तर्फे विविध ठिकाणी पदोन्नतीतील अरक्षणासाठी आंदोलन

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.१जून):- पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा या मागणीसाठी आज दि. १ जून पासून रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोललनाचा धडाका सुरू झाला आहे.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आज राज्यभर तसेच मुंबईत ही अनेक ठिकाणी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. आज पासून सुरू झालेला रिपाइं चा आंदोलन सप्ताह राज्यभर दि. ७ जून पर्यंत सुरू राहणार असून महाविकास आघाडी सरकार ने दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या संयमाचा अंत पाहू नये असा ईशारा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी राज्य सरकार ला दिला आहे.

मुंबईत ताडदेव सर्कल येथे पदोन्नतीमध्ये अरक्षणाच्या मागणीसाठी रिपाइं चे सोना कांबळे ;नामदेव सरवदे; ऍड आशा लांडगे चंद्रकांत कसबे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. चेंबूर मध्ये युबक आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनील शिरसाट ;सिद्धार्थ कासारे; रवी सावंत यांनी आंदोलन केले. संजय डोळसे यांच्या ही नेतृत्वात अणुशक्ती नगर येथे आंदोलन करण्यात आले. सिद्धार्थ कॉलनी येथे रवी गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. गोरेगाव आरे कॉलनी सिग्नल येथे रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात तसेच रमेश पाईकराव;फुलचंद कांबळे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यात सोलापूर येथे रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजा सरवदे; कोल्हापूर येथे प्रा शहाजी कांबळे उत्तम कांबळे आदींच्या नेतृत्वात पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले.
आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हा अधिकारी आणि तहसील कार्यलयावर दि.१ जून ते ७ जून पर्यंत रिपाइं तर्फे आंदोलन सप्ताह आयोजित केला आहे. या आंदोलनात कोरोना प्रसाराचे नियम पाळून गर्दी न करता आंदोलन करण्याच्या सूचना ना रामदास आठवले यांनी दिल्या आहेत