प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देगलूर तालुक्याच्या वतीने वृक्षारोपण व मास्क वाटप

27

✒️महादेव उप्पे(विशेष प्रतिनिधी)

देगलूर(दि.7जून):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेताच लक्षात येते की ही संघटना तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे.दि. ५ जून रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुकाध्यक्ष मिलिंद कावळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे कावळगाव व देगलूर येथे मास्क वाटप तसेच करडखेड येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आले.

असून यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, जिल्हा संघटक विशाल पवार, सुधांशू कांबळे (दै.गाववाला भोकर ता.प्रतिनिधी) शेख अस्लम (तरुण भारत ता.प्रतिनिधी देगलूर) इर्शाद पटेल (दै.समिक्षा ता. प्रतिनिधी देगलूर) नाझीम शेख (लोक रत्न ता.प्रतिनिधी देगलूर) सुभाष कदम (ता.उपाध्यक्ष भाजप देगलूर) युवा नेते नरेश राचलवार, युवा नेते शिलानंद ढवळे, युवा नेते शिरगिरे सर उपस्थित होते.वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी मागस्वगीय विभागाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, माजी सरपंच बाळासाहेब देशमुख, प्रा.रामचंद्र गायकवाड, करडखेड सरपंच गणपतराव शिळवणे, युवा नेते बालाजी इबितवार, ग्रामसेवक, तोटावार , युवा नेते माधव येसगे, सरपंच प्रतिनिधी माधव वाडेकर, सतीश वंटे, महेश देशमुख, गणपत वंटे, ऍड. राहुल देशमुख, रमेश सोनकांबळे, संग्राम येलबुगडे, अंकुश सूर्यवंशी, नरेश राचलवार, सौ.काळे मॅडम, सौ.चिंचोले मॅडम, सौ.शिवपुजे मॅडम, अनिल सोनकांबळे, नागोराव सोनकांबळे, शिरगिरे देगलूर, करडखेड, कावळगाव परिसरातील मित्र परिवार उपस्थित होते.