एमआयडीसी ने कार्यवाही करण्यास दिलेले पत्रातील निर्देश मुजोर विकासक विमल शहाणे मारले फाट्यावर

35

🔸प्रकल्पात चोरीसह मुजोरी रिपाई सहन करणार नाही:- डॉ राजन माकणीकर

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.7जून):- एमआयडीसी झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात विकासक विमल शहाणे एसआरये चे सर्व नियम धाब्यावर ठेवून एमआयडीसी अधिकाऱ्याने दिलेले कार्यवाहीचे पत्र सरळ फाट्यावर मारले असून चोरी सह मुजोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा रिपाई डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला आहे.

प्रकल्पात असंख्य त्रुटी व अडचणी आढळून आल्याने एमआयडीसी प्रशासनाने ९ ऑक्टोम्बर २०२१ रोजी विडिओ कॉन्फरन्स मीटिंग घेऊन दि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी योजनेचे काम कालबद्ध मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, मात्र: मुजोर आकृती हब टाऊन विकासक विमल शहाणे सर्व निर्देश फाट्यावर मारले आहेत.

गोर गरिबांच्या हक्काची घरे व जमीन तसेच शासनाच्या प्रकल्पात तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेली चोरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्या माध्यमातून मागील ८ वर्षांपासून उघड करत असून महादलाल मुरजी पटेल हा या सर्व भ्रष्टाचाराचा मास्टर माईंड असल्याचे निदर्शनात आले आहे.

मुरजी च्या कारभाराची महाठग विमल शहा हतबल झाला असला तरी चोरांच्या यादीत जनतेच्या नजरेत हिटलिस्ट वर विकासक विमल शहा असलयाचे डॉ. माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले आहे.

एमआयडीसी प्रशासनाने दिलेले निर्देश असे की, दि २२ ऑगस्ट २०२१ रोजी लॉटरी झालेल्या पात्र झोपडीधारकांना १५ दिवसात लोटरीनुसार कायमस्वरूपी सदनिका द्यावी, पॉकेट ५ इमारत १ व २ पिण्याच्या पाण्याचे थकीत बिल भरून नळजोडणी करावी, कराराप्रमाणे २२.५% पोटी परत काराव्याचे क्षेत्र दि ३१ डिसें २०२० पर्यंत एमआयडीसी ला हस्तांतरण करावे, मोकळ्या भूखंदापोटी एमआयडीसी स परत काराव्याचे क्षेत्र दि ३१ मार्च २०२१ पर्यंत हस्तांतरण करावे,पात्र अपात्र निर्णयाबद्दल प्रलंबित पात्र झोपडी धारकांच्या नावाची यादी, झोपडीचा नकाशा, कागदपत्र व झोपडीच्या स्थितीचा अहवाल पाठवावा.

झोपडी निष्काशीत केलेले तसेच सद्यस्थितीत जागेवर असलेल्या प्रलंबित झोपड्यांची यादी, नकाशा अहवाल व कागदपत्र एमआयडीसी ला सादर करावे,ज्या झोपडी धारकांना भाडे धनादेश देण्यात आला नाही त्यांना महीनाभरात थकीत भाडे द्यावे, विकासक कार्यालय आठवड्यात स्थापन करावे, मूलभूत सुविधा गाळे संबंधित सोसायटीस १ महिन्यात हस्तांतरण करावे, पुनर्वसन इमारत लवकर उभी करून झोपडी धसरकांना वाटप करावे,विकासाकामार्फत वाटप केलेल्या आर सी व कमर्शिअल गाळ्यांची माहिती १० दिवसात द्यावी. १०. सोसायटीचे फेडरेशन लवकर स्थापन करावे. अपात्र व घुसखोरी केलेल्यांना बाहेर काढावेअसे आहेत.

मात्र; तसे काही होतांना दिसून आले नसल्याने ही जागा विक्री घटकामध्ये धरण्यात आली आसल्याचे निर्देश कार्यकारी अभियंता एमआयडीसी ठाणे यांचे कडुन देण्यात येऊनही काही गोष्टींना वर्ष तर काहींना महिने उलटून गेले आहेत.अश्या मुजोर आकृती हब टाऊन विकासकांच्या विरोधात पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी कॅप्टन श्रावण गायकवाड व टीम सह आंदोलन उभारणार असल्याचे संकेत डॉ. राजन माकणीकर यांनी दिले आहेत. शिवाय कोणी विकासक विमल शहा, महादलाल मुरजी पटेल व दलाल केवल वालमभिया याच्या कडून काही त्रास अडचण किंवा कोणती तक्रार असल्यास डॉ माकणीकर यांच्याशी थेट संपर्क साधावा असेही आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.