भूम तालुक्यात विविध ठिकाणी शिवराज्यभिषेक दिन साजरा

65

✒️धुळे प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे)

धुळे(दि.7जून):-भूम तालुक्यामध्ये आज शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पंचायत समिती मध्ये सभापती मैनाताई भडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व गटविकास अधिकारी बी. आर .ढवळशंख यांच्या हस्ते भगवा पताका फडकवण्यात
आला .यावेळी सभापती मैनाताई भडके , उपसभापती बालाजी गुंजाळ, गटविकास अधिकारी बी. आर.ढवळशंख , विस्तार अधिकारी व्ही. जे. वाघमारे, पशुसंवर्धन अधिकारी पांडुरंग इंगोले , आस्था पणा विभागाचे मेटकर साहेब , घरकुल विभागाचे काळे साहेब ,ग्रामसेवक संघटनेचे संतोष बनसोडे ,शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी भडकेव पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्तीत होते.

तसेच ग्रामपंचायत कार्यालय आरसोली, भूम ,वालवड पाथरूड , बावी, ईट , वंजारवाडी , देवग्रा, माणकेश्वर, देवळाली , हाडोग्री इत्यादी गावामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला . यावेळी मा सभापती संजय पाटील, ग्रामसेवक काकडे , वैभव पाटूळे नागेश नागटीळक, सागर पाटूळे, अमर डोके ,बालाजी डोके, संभाजी मोहिते , सुरज पवार, विठ्ठल बाराते, टीचर असोसिएशन अध्यक्ष निलेश वीर , पोलीस पाटील लक्ष्मण तेलंगे,ग्रा सदस्य सचिन थोरात , गोरख चव्हाण , दत्ता पिंपळे, मयूर बोराडे , नवनाथ बोराडे, किरण बोराडे, करण अंधारे , दीपक पाटील , मराठा सेवा संघाचे बंटी पाटील व ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी उपस्तीत होते.