जायन्टस् गृप मार्फत वाढदिवसा निमित्ताने अन्नदान कार्यक्रम

81

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.7जून):-जायन्टस् मिडटाउन गृपकडून जनकल्याण रोटी व कपडा बॅंक यांच्या सहयोगाने मा. राज्यपाल भगतसिंग कोशियार हस्ते कोरोना योध्दा पारितोषिक प्राप्त नगरसेवक जितेंद्र गिरासे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदान व टिफीन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. फेडरेशन प्रेसिडेंट चंद्रकांत जाधव होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी मिडटाउन संस्थापक अध्यक्ष रविंद्र चित्ते सर, नगरसेवक युसुफ बोहरी, फेडरेशन आॅफिसर भिमलिंग लिंभारे, फेडरेशन ऑफिसर डाॅ ईशरत बानो शेख , चंद्रसिंग राजपूत, जायन्टस् अध्यक्ष सुनिल शिंदे, मिडटाउन अध्यक्ष प्रशांत चितोडकर, कल्याणसिंग जोधा, रोटी बँकेचे हुसेनभाई विरदेलवाले,मनोज निकम सर होते.

कोरोना काळात अतिशय मेहनत घेऊन गोरगरीब व सामान्य जनतेसाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणा-या एका सच्चा समाजसेवकाचा अर्थात जितेंद्र गिरासे सरांचा वाढदिवस गरजूंना अन्नदान व टिफीन वाटप करून कोरोना नियमांचे पालन करून सध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. याकरिता जायन्टस् मिडटाउन सदस्यांनी सहकार्य केले.उपस्थित सर्व मान्यवरांनी जितेंद्र गिरासे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अन्नदानाबद्दल समाधान व्यक्त केले.