‘केक’ कापून नाही तर झाड लावून आणि चहा बिस्कीट वाटून केला वाढदिवस साजरा

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.8जून):-राजनगट्टा येथील अनुप कोहळे या युवकाने वाढदिवसाच्या दिवशी व्यर्थ खर्च टाळून अतीशय पर्यावरण पूरक असा वाढदिवस साजरा करत सहपरिवार वृक्षारोपण केले व वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.

इतकेच नाही तर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, येथे जाऊन गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस सोबत मिळून संयुक्त रित्या रुग्णाच्या नातेवाईकांना चहा, बिस्केट व जेऊ वितरण केले. सदर कार्यक्रमास कांग्रेस प्रदेश अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, ना.विजय वडेट्टीवार,मंत्री म.राज्य, आ.अभिजित वंजारी आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा सुद्धा दिल्या.