कृषि पदवीधर संघटनेचा 10वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

22

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.8जून):-कृषि पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य चा 10वा वर्धापन दिवस 7 जून 2021रोजी ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कृषि पदवीधर संघटना हि राज्य पातळीवर कृषि व संलग्न पदवीधरांनी, पदविकाधारकांनी आणी युवा शेतक-यांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली आणी कृषि विषयाला वाहिलेली सामाजिक संस्था व संघटना आहे. विद्यार्थी संघटनांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्नांच्या माध्यमातून या संस्थात्मक संघटनेचा 2012 साली जन्म झाला आणी तेव्हा पासुन सातत्याने संघटना अनेक नवनवीन उपक्रमांसमवेत कार्यरत आहे. 10वा वर्धापन दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महासचिव कृषीभूषण महेश कडुस पाटील, संघटनेचे संचालक मंडळ कृषिश्री प्रतिक भोंगाडे, कृषिश्री मनिष भदाने व कृषिश्री उदय गर्जे (प्रदेशाध्यक्ष विदर्भ युवक आघाडी) उपस्थित होते. यावेळी कृ.प.संघटनेचे महासचिव महेश कडुस पाटील यांच्या हस्ते किसानभारती वर्धापन दिन विशेषांक चे प्रकाशन करण्यात आले व मनोगत व्यक्त करतांना प्रत्यक्षात विदर्भात येवुन संघटना बळकटीसाठी कार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.

ऑनलाईन कार्यक्रमावेळी कृ.प.संघटनेच्या वतीने मागील वर्षी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा अहवाल संघटनेतील विविध विभागाने सादर केला .यात प्रामुख्याने विद्यार्थी विभागाचा अहवाल मा.प्रतिकजी बोडखे यांनी सादर केला,युवती आघाडीचा अहवाल मा.मयुरीताई सुरकार यांनी सादर केला तर पदवीका आघाडीचा अहवाल मा.अभिजीतजी घोरड यांनी सादर केला. सोबतच संघटनेतील नवनियुक्त पदाधिका-यांचे संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्राचीताई नागोसे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हि वचनपुर्तीची व प्रामाणिकतेची 10 वर्ष साजरी करत असतांना अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली यात कृषिश्री प्रतिक भोंगाडे, कृषिश्री मनीष भदाने, कृषिश्री उदय गर्जे, डाॅ.चित्तरंजन भांदुर्गे,मा.आदित्य सावळे, कृषिश्री प्रतिक बोडखे, अंकुशजी टेंभरे, अभिजीतजी घोरड, मयुरीताई सुरकार यांचा समावेश आहे. कार्यक्रमाला संघटनेतील विदर्भातील समस्त युवक आघाडी, विद्यार्थी आघाडी ,युवती आघाडी व पदवीका आघाडी मधील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन कृ.प.संघटना विदर्भ प्रदेश युवती उपाध्यक्ष प्रतिक्षा संध्या भास्कर थुटे यांनी केले तर पदविका आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहेर चांदुरकर यांनी आभार मानले.