मोहता मिल लॉकडाऊन न करता मिल पूर्वव्रत सुरु करण्याचे सरकार तर्फे आदेश द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

28

🔸माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांची भेट घेऊन दिले निवेदन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.८जुन):-आर.एस.आर मोहता स्पिनिंग अंड विविंग मिल (मोहता इंडस्ट्रीज) हिंगणघाट जि वर्धा यांना मिल लॉगडाऊन करण्याची परवानगी न देण्याबाबत तसेच मिल पूर्वव्रत सुरु करण्याचे सरकारतर्फे आदेश देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नाना पटोले हिंगणघाट येथे आले असताना त्यांची भेट घेऊन मोहता मिल पूर्वव्रत सुरू करण्याची मागणी केली.मोहता इंडस्ट्रीज लि हिंगणघाट यांनी १७ मे २०२१ रोजी महाराष्ट्र ट्रेड युनियन आणि प्रोहिबिशन लेबर ॲक्ट ५-१९७१ नुसार सब सेक्शन (२) सेक्शन २४ नुसार स्पिंनिंग अंड व्हिविंग डिपारमेंट लॉकडाऊन करण्याचे बिना सहीचे नोटीस पाठविले आहे.

त्यांचा कालावधी ०१ जुन २०२१ पासून राहील असे नमूद केले आहे. परंतु ०१ ते ०५ जून पर्यंत लॉकडाउनचा नोटीस लावला.
मोहता इंडस्ट्रीज ने ०६ जून पासून मिल ला टाळेबंदी लावली असून बंद आहे. त्यामुळे कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दोन टप्प्यात लॉकडाउन असल्यामुळे ०१ जुन २०२१ पर्यंत मोहता मिल इंडस्ट्रीजने जाणून-बुजून कंपनी बंद ठेवली. या कालावधीत जिल्ह्यातील कार्यरत उद्योगाला या देशातून सूट देण्यात आली होती परंतु या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून उद्योग बंद ठेवून ६५० कामगारांच्या आर्थिक नुकसान केले आहे.मोहता इंडस्ट्री हिंगणघाटला 125 वर्षाची जुनी परंपरा असून या ग्रुपने या कंपनीच्या भरोशावर एक्सपोर्ट कॉलिटीच्या इंडस्ट्रीज परिसरात उभ्या केल्या आहे.

मोहता इंडस्ट्रीने 2017 मध्ये कपडा खाता बंद करून कामगारांना व्ही.आर.एस दिला नाही त्यासंबंधाने नागपूर हायकोर्ट केस चालू आहे तसेच या कामगारांना न्याय देण्यासंबंधी दोन मीटिंग कामगार मंत्रालयात पार पडल्या. अजूनही त्यावर निर्णय झाला नाही.मागील दोन वर्षापासून प्रोसेसिंग आणि फोल्डिंग खात्यात इल्लीगल लेआॅफ सुरू असून कामगारांना अर्धा पगार सुरू आहे कंपनीच्या अडेलतट्टू धोरणानुसार कामगारांच्या लेआॅफची केस कोर्टात सुरू आहे. मागील 02 वर्षापासून कामगारांना अर्धा पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही.

अशी गंभीर परिस्थिती कामगारांवर आली असून उपासमारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कामगारांच्या परिवाराचे भविष्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.तरी हिंगणघाट येथील कामगार नगरीचे हीच लक्षात घेता मोहता इंडस्ट्रीला सरकारने ‘मिल लॉकडाउन’ करण्याची परवानगी देण्यात येऊ नये तसेच मिल पूर्वव्रत सुरु ठेवण्याचे सरकारतर्फे आदेश देण्यात यावे अशी निवेदनाद्वारे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांची भेट घेऊन मागणी केली आहे.