रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने केली डोंगर भागातील शेतकऱ्यांची फसवणूक

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

गंगाखेड(दि.9जून):-दि.08.06.2021रोजी डोंगरी विकास जन आंदोलनच्या वतीने डोंगर भागातील माखणी पिंपदरी राणीसावरगा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिक विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने दिला नसुन डोंगर भागातील शेतकऱ्यांची फसवणूक केली असुन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी विरोधात व कंपनीला सहकार्य करणाऱ्या कृषी वीभागाचा अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व डोंगर भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिक विमा तात्काळ देण्यात आला पाहिजे.

असे प्रत्येक शेतकऱ्यांचे वयक्तिक तक्रार अर्ज गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हाजारोच्या संख्येने डोंगरी विकास जन आंदोलनच्या वतीने दाखल करण्यात आले डोंगर भागातील माखणी पिंपदरी राणीसावरगा या डोंगर भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिक विम्या बाबतीत कृषी वीभागाणे कंपनी विरोधातआठ दिवसात कार्यावाही करून डोंगर भागातील माखणी पिंपदरी राणीसावरगा या डोंगर भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिक विम्या बाबतीत निर्णय नाही झाल्यास डोंगरी विकास जन आंदोलनच्या वतीने डोंगर भागातील शेतकऱ्यांचे तीव्र स्वरूपाच आंदोलन करण्यात येणार आहे डोंगर भागातील शेतकऱ्यांचे हाजारो तक्रार अर्ज दाखल करण्यात आले