पोलीस शिपाई यांची तीन वर्षीय मुलगी आर्या रचनार इतिहास

29

✒️सचिन महाजन(विशेष प्रतिनिधी)मो:-9765486350

वर्धा(दि.10जून):-महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यामधील छोट्याशा पुलगाव शहरातील पोलीस शिपाई यांची मुलगी आर्या पंकज टाकोने (वय 3 वर्षे) ही 1000 मीटर रनिंग मध्ये विश्वविक्रम करणार आहे. आपल्या आशिया खंडात 50 देश आहे त्यातील 50 देशातून आलेले स्पर्धेक सहभाग नोंदविणार आहे. त्यात जगात अगदी कमी वयात विश्वविक्रम करून भारत गिनीज बुकात आर्या आपले नाव कोरणार आहे.

त्यात भारत देशाचा तिरंगा 50 देशात सर्वात उंचीवर दिसणार आहे, ही अत्यंत गर्वाची बाब आहे परंतु कोरोना महामारी असल्यामुळे ही स्पर्धा सॅटेलाईट आणि ड्रोनद्वारे शूटिंग होणार आहे. ती वर्ड रेकार्ड युनिव्हर्सिटी विवेतनाम येथे आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी ति लहान गावातून ज्युनियर मिल्खा प्रसिद्ध आर्या ला तेथील गावकऱ्यांनी तिच्या कार्याला पूर्ण करण्यासाठी ईश्वर शक्ती देवो अशा शुभेच्छा देत लोकांनी आनंद व्यक्त केला.