शहरातील केरकचरा, नाले, गटारी साफ करा- जमाअत ए इस्लामी हिंदची मागणी

25

🔹पर्यावरण संवर्धनावर विशेष लक्ष द्या

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.13जून):- पावसाळा सुरू झाल्याने रोगराईच्या दृष्टीने पुर्व नियोजन म्हणून शहारातील कचरा, शहरालगतच्या नाल्यामधील गाळ तसेच शहरालगतची सर्व गटारे साफ करावी. मागील वर्षी पावसाळ्यात फातेमा कॉलनी मध्ये पाणी शिरले होते . त्यावर उपाययोजना म्हणून जामा मस्जिद मागील नाला पावर हाऊस ते फातेमा कॉलनी ते लिंगायत मोक्षधाम पर्यंतचा नाला जेसीबीने साफ करावा . पर्यावरण संवर्धनावर विशेष लक्ष देत, शहरात प्रचंड प्रमाणात इतरत्र पसरलेल्या केरी बॅग ची पर्यावरणाच्या दृष्टीने त्याची विल्लेवाट करावी.अश्या आशयाचे निवेदन जमाअत ए इस्लामी हिंद, उमरखेड तर्फे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

संघटने तर्फे पर्यावरण दिनानिमित्त सुरु असलेल्या मानवतेची दोन मिशन -आत्मसंरक्षण व पर्यावरण रक्षण अभियाना अंतर्गत १०० झाडे लावण्याचा संकल्प आहे . त्या साठी पालीके ने १०० झाडे व५०ट्री गार्ड उपलब्ध करून द्यावे यासाठी पण एक वेगळे निवेदन यावेळी देण्यात आले.निवेदन देतांना स्थानिक अध्यक्ष काझी जहीरोद्दीन ,राहत अन्सारी, युथ विंगचे इंजी . सुहेल शेख, एसआयवोचे हाफीज नदीम,मो. नजीब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.