मरेगााव वाघ शिकार प्रकरणाची सखोल चौकशी करा

24

✒️सिंदेवाही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिंदेवाही(दि.15जून):- सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत मरेगााव कक्ष क्रमांक २६१एक महिण्याअगोदर वाघाची शिकार करुन अवयव काढल्याचे धक्कादायक प्रकरण बाहेर आले. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडुन ११नखे , १६मिशांची केसं, ४ हाड व ४ दाते जप्त करण्यात आली. चारही आरोपिंना अटक करण्यात आली.

सिंदेवाही तालुक्यात आंतराष्ट्रीय वन्यजीवांची शिकार करण्याची टोळी सक्रिय झाल्याची शंका आहे. चार आरोपी व्यतिरिक्त अनेक आरोपी या शिकार प्रकरणात सामिल असल्याचा अंदाज आहे. वनविभागाने आपली तपासाची चक्रे वाढवावी. सध्या सिंदेवाही तालुक्यात वाघांची शिकार करणारी अंतराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा अंदाज आहे. या क्षेत्रात शिका-यांचे धाडस वाढले आहे.यावर शिका-यांच्या मुसक्या आवळुन पायबंद घालणे गरजेचे आहे.सिंदेवाही तालुक्यात अनेकदा वारंवार वाघ शिकार प्रकरणे समोर येत आहे.

यामुळे वाघांच्या संवर्धनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. या मरेगााव वाघ शिकार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली आहे. अंधश्रद्धेसाठी या अवयवांचा वापर करण्यात आला. या आरोपींची कसुन चौकशी केल्यास बाकिच्या आरोपीचे सुराग मिळेल. वन्यजीव संरक्षण अधिनियम व अंधश्रद्धा निर्मूलन नुसार कठोर कारवाई करण्यात यावी.