राजगडावरच नाही तर कुठल्याही गड-किल्ल्यावर रोप वे नकोत – राजेश पाटील मोरे

31

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.16जून):- महाविकास आघाडी सरकारने राजगडावर रोप-वे लावण्याचा निर्णय घेतला यावर प्रतिक्रीया देत असताना छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी कोणत्याही गडकिल्ल्यांवर रोप-वे लावु नका असे म्हटले आहे.
एका इतिहास अभ्यासक व इतिहास प्रेमी च्या मते तरी हा निर्णय चुकीचा आहे अस मला वाटतं…राजगडावर असो किंवा इतर कोणत्याही गडावर असो ज्यावेळी रोप वे सारखे यांत्रिकी सुविधा सुरू करण्यात येतात त्यावेळी गडावर पोहोचण्यास व उतरण्यास सोपे व सोयीस्कर होईल परंतु गडावर पायी चालत जाण्यात व गडासंबंधित प्रत्येक वास्तुची माहिती घेण्यात जो आनंद आहे तो रोप वे मध्ये थाटात बसुन प्राप्त होणार नाही…

जर मावळ्यांच्या पराक्रमाची अनुभुती घ्यायची असेल तर इतिहासाची साक्ष देणार्‍या गडकिल्ल्यांची पायपीट करूनच सैर करावी लागेल…गडकिल्ल्यांवर रोप वे सुविधा सुरू केल्यावर वैज्ञानिक तंत्रज्ञानाची भर पडेल परंतु तुम्ही गौरवशाली इतिहासाची अनुभुती घेऊ शकणार नाही.राजगडावरील रोप-वे लावण्याचा निर्णय सरकारने तत्काळ मागे घ्यावा अन्यथा छावा युवा संघटनेच्या वतीने पुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभे करु असेही राजेश पाटील मोरे यांनी म्हटल आहे