पत्रकारांसाठी वैद्यकीय सुविधा देणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक

89

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.17जून):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नाशिक जिल्हा कार्यकारणीची पूर्वनियोजित बैठक १६ जून २०२१ रोजी शासकीय विश्रामगृह नाशिक येथे
माननीय डी.टी.आंबेगावे यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र प्रमुख माननीय नवनाथ गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.याप्रसंगी नाशिक शहर जिल्हाध्यक्ष चंदन खतेले व नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदू पगार यांच्या उपस्थितीतनवनाथ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नाशिक जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नाशिक जिल्हा बैठकीमध्ये पत्रकारांसाठी वैद्यकीय उपचार, मोफत बस प्रवास, मोफत टोलनाका, पत्रकार विमा संरक्षण, प्रत्येक तालुक्यात मीटिंग,पत्रकारांसाठी राखीव भूखंड, नाशिक जिल्हा संघटना सदस्यनोंदणी करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी अनेक प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्यात आले त्यानंतर संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे संघटना मजबूत करणे असा ठाम निर्धार सर्व पत्रकारांनी केला.

बैठकीचे आयोजन सुरेख पद्धतीने करण्यात आले होते.
उत्तर महाराष्ट्र प्रमुख नवनाथ गायकर, नंदु पगार, चंदन खतेले, रोहित ताहराबादकर, दानिश शेख, इम्रान अत्तार, सोमनाथ क्षत्रिय, जाहीद शेख, वैभव भाबर, साजिद शेख, प्रदीप पाटील, पांडुरंग दोंदे, बाबासाहेब गोसावी, जितेंद्र साठे, विजय आव्हाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.उत्तर महाराष्ट्र प्रमुख गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक शहर जिल्हाध्यक्ष चंदन खतेले व ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदू पगार यांच्या सहमताने नवीन जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. नवीन जिल्हा कार्यकारणी अशी : जिल्हा समन्वयक जाहिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष जयदीप भदाणे, साजिद शेख, बाबासाहेब गोसावी, जिल्हा संघटक सोमनाथ क्षत्रिय, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, नाशिक रोड शहर प्रमुख दानिश शेख, युवा जिल्हा अध्यक्ष इम्रान अत्तार, त्रंबकेश्वर तालुका अध्यक्ष पांडुरंग दोंदे आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत दिलखुलासपणे व्यक्त केले बैठक अतिशय सुंदर रित्या पार पाडण्यात आली. यावेळी नवनाथ गायकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
साजिद शेख, सोमनाथ क्षत्रिय, दानिश शेख, जाहीद शेख आदी पदाधिकाऱ्यांनी बैठक यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.