माण येथील लाकडाऊन बाबतचा निर्णय सोमवारी-प्रांताधिकारी यांची माहिती

34

🔹आता अंत पाहू नका, व्यावसायिकांची आर्त विनवणी

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण) मोबा.9075686100*

म्हसवड(दि.19जून):-कोरोना महामारीचा सामना करून ती रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात लॉक डाऊन जाहीर केला त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले तेव्हापासून माण तालुक्यातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली, पण आज तालुक्यातील छोटया व्यावसायिकांची दुकाने अडीच ते तीन महिने बंद आहेत त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आमच्या व्यवसायावर मोठे संकट उभे आहे त्यामुळे दुकाने चालू करण्याची मागणी व्यावसायिकाच्यातून होत आहे.

काल मध्यरात्रीपासून सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील रुग्णवाढ पाहून जिल्हा तिसऱ्या लेवलला असल्यामुळे त्याप्रमाणे जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिलता दिली असून सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते 4 वाजे पर्यत सुरु ठेवण्याचे आदेश काढले आहेत परंतु माण तालुक्यातील जनता आणि व्यावसायिक कंटेन्मेंट झोन असल्यामुळे अजून सँभ्रमामवस्थेत आहेत कि दुकाने चालू होणार की नाही.दहिवडी व म्हसवड गावाची लोकसंख्या विचारात घेऊन हॉटस्पॉट बाबत चा निर्णय घ्यावा. सर्वसामान्य जनतेच्या, व्यावसायिकांच्या अडचणी विचारात घेऊन आता सर्व दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशी आर्त विनवणी व्यवसायिकांनी केली आहे.

जर का आता दुकाने चालू झाली नाहीत तर छोटया व्यावसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.गाळाभाडे चालू आहे,लाईट बिल चालू आहे आम्ही करायचे काय आमचे व्यवसाय मोडकळीस आले असून तालुका प्रशासन कोणते नियम लावत आहे ज्यामुळे तालुक्यातील लॉक डाऊन शिथिल होत नाही अशी विचारणा व्यवसायिक करत आहेत.प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी,माहिती देताना म्हणाले,सोमवारी तालुक्यातील कोरोना च्या परिस्थितीचा आढावा घेऊन कोणकोणती गावे हॉटस्पॉट आहेत ते जाहीर करण्यात येईल.त्यानुसार दहिवडी,म्हसवड ही गावे खुली होणार का ते जाहीर करण्यात येईल.यासाठी आरोग्य विभाग,नगरपंचायत व तहसील कार्यालय यांचा अहवाल पाहून निर्णय देण्यात येईल.