आष्टीच्या फार्मसी कॉलेजमध्ये ऑनलाइन प्रणालीद्वारे नोकरी संदर्भात मार्गदर्शन संपन्न

  46

  ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

  आष्टी(दि.20जून):-आनंद चारिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी,आष्टी (डी.फार्मसी) व कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रीसर्च (बी.फार्मसी) संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमसेन धोंडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी औषध निर्माण या व्यवसायिक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी मिळण्यासाठी,करिअर करण्यासाठी आष्टी व कडा परिसरात फार्मसी पदविका व पदवी या कॉलेजची स्थापना केली.आष्टी येथील कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू नंतर १९ जून रोजी दोन्हीही कॉलेजच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रणाली द्वारे वेबीनार मार्फत फार्मसी कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर जगामध्ये औषध निर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये कोण कोणत्या नोकरी,कुठे कुठे उपलब्ध आहेत.

  त्याबद्दल डॉ. दीपक पारधी (सीइओ एज्युकेअर ग्रुप,एमएससी न्यूझीलंड युनिव्हर्सिटी,मॅनेजिंग डायरेक्टर सन शाईन कन्सल्टन्सी लंडन लिमिटेड) यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
  विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा भाग की कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर कशा पद्धतीने औषध निर्माण क्षेत्रामध्ये नोकरी मिळवायची,आपल्याला औषध निर्माण क्षेत्रांमध्ये गुणवंत कसे बनवायचे,त्यासाठी काय तयारी करावी लागते ,स्वतःमध्ये कोणते स्किल पाहिजेत.सर्व भाषा वर कसे प्रभुत्व असावे या सर्व गोष्टी संदर्भात डॉ.दीपक यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.फार्मसी कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतरही काही अल्पावधीचे कोर्स करून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या औषध निर्माण कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळवता येते,परदेशातही कशा पद्धतीने नोकऱ्याचा संधी उपलब्ध आहेत याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

  या ऑनलाइन झालेल्या वेबिनारला डी व बी फार्मसी अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला.सध्या कोरोना च्या काळामध्ये विद्यार्थ्यांना या ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करून मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमसेन धोंडे ,संचालक अजय (दादा) धोंडे,युवा नेते अभय धोंडे,प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे ,शिवाजी वनवे ,संजय शेंडे,कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कोल्हे यांनी डॉ.दीपक पारधी यांचे आभार मानले.अशाच पद्धतीने इथून मागे ही खूप सारे वेबिनार कॉलेज मार्फत घेतली गेली,तसेच यापुढेही वेगवेगळ्या औषध निर्माण क्षेत्रातील विद्वान व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ह्या कॉलेज मार्फत दिली जातील असे कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कोल्हे यांनी सांगितले.या सर्व वेबिनारचे नियोजन कॉलेजचे प्लेसमेंट,इनोवेशन सेल्स ऑफिसर प्राध्यापक अभिजीत कोपनर सर,गणेश साबळे सर,सागर मुळे सर यांनी केले.