धामणगाव येथे मोहिमेअंतर्गत covid-19 लसीकरण संपन्न

29

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.25जून):- तालुक्यातील धामणगाव येथे मोहिमे अंतर्गत धामणगाव येथे कोवीड लसीकरण घेण्यात आले. या लसीकरणाला गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील लोकांचा प्रतिसाद पाहता असे लक्षात येते की, की कोविड विषाणू विषयी गावामध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती झालेली आहे आणि कोविड लस चे महत्व समजले आहे. त्याचप्रमाणे गावातील प्रमुख व्यक्तींनी याविषयी जागृती केलेली दिसून येते. या अगोदर सुद्धा धामणगाव येथे 45 वर्षांवरील वयोगटातील लोकांचे कोविड लसीकरण मोहीम घेण्यात आले होते.

त्यावेळी सुद्धा खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. आणि आज 45 वरील नागरिक सरासरी 95% च्या वर लस घेऊन झाले आहेत. आम्ही आता काही दिवसातच 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे 100% लस घेतलेले पूर्ण करू, असा विश्वास गावातील सरपंच श्री सुनील जोगाजी झाडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. प्रणील पत्रीवार, डॉ. अश्विनी आखाडे मॅडम, आरोग्य सेविका के. बी. पिसे मॅडम, आरोग्य सेविका यू. सी. निमगडे मॅडम, आरोग्य सेवक जी. डी. गायकवाड सर, मदतनीस के. मी. जंपलवार ग्रामसेवक एम. ए. आक्नुरवार मॅडम, सरपंच श्री सुनील जोगाजी झाडे, उपसरपंच नंदू ठाकूर, ICRP सौ. जयश्री बावणे इत्यादी उपस्थित होते.