भीम टायगर सेनेच्या वतीने ग्रामीण पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिले निवेदन सादर

32

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25जून):-ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद अंतर्गत येत असलेल्या वडद (ब्रम्ही )गाव व तांडा मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा वाढत असल्याने पुरुषांसह युवा वर्ग हि दारूच्या आहारी गेल्याने संसार तुटण्यासह गावातही भांडण तंटे वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्श्‍न निर्माण झाला आहे ,असण्यासोबतच महिलांना लज्जास्पद वागणूक देणारे कृत्य वाढत असले तरी पोलीस मात्र अर्थपुर्णसंबध जोपासत असल्याने आज महिलांनी थेट पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठून दारू बंदीची मागणी केली आहे. परंतु दारूची समस्या ऐकणे ऐवजी ” एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कशाला आल्या, तुमच्यावरच गुन्हा दाखल होईल ” असा प्रतिप्रश्न उपस्थित करत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला.

तसेच महिलांनीच हातात काठी घेऊन दारू बंद करायला पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा पोलिसांनी महिला समोरून व्यक्त केल्याने पोलीस आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी समस्या मांडायला आलेल्या महिलांवरच प्रश्नाची भडीमार केली परंतु महिलांनी सुद्धा प्रतिउत्तर देत “जर पोलीस वाले हप्ते घेत नसतील तर धडक कारवाई करून आमच्या गावाची दारू बंद करून दाखवा ” अशा उत्तराने पोलिसांना चुप केले परंतु पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे आता या निवेदनाची दखल होती की नाही ?असा प्रश्न महिलांसमोर उभा राहिला आहे. भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आलेल्या निवेदनात वडद येथील शेकडो महिलांनी सह्या करून अवैध देशी दारू व गावठी दारू विकणार्‍यांची यादी सुद्धा त्यांनी निवेदनासोबत दिली आहे .निवेदनावर बेबीबाई पडघणे,अनिता पडघणे, राधा भोरकडे,सुवर्णा धनवे, रंजना तोडकर, झिंगुबाई कांबळे, ताईबाई खंदारे,रेणुका खुळे,वैशाली खङसे,शशिकला कुरुङे,कमल शिंदे यांच्यासह शेकडो महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.