भाजपचे ओबीसी आरक्षणा संदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद – अखिल भारतीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी

26

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)

नायगाव(दि.26जून):-ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्या विरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना, भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे.

आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवं यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका.इतकंच नाही तर रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. “आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर १/८/२०१९ रोजी तसेच दि. १८/९/२०१९ रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही.

खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते”
असा सवाल ना.फडणवीसांना अखिल भारतीय ओबीसी महासंघ चे मा. राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक रवीकुमार स्वामी यांनी केला आहे.